Grampanchyat Election : मंगळवेढा तालुक्यात दोन सरपंचासह 23 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध

मंगळवेढा तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीसाठी सुरू असलेल्या निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या अर्जातील 71 तर सदस्य पदासाठी 297 उमेदवारांची माघार.
Grampanchyat Election
Grampanchyat ElectionSakal
Updated on
Summary

मंगळवेढा तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीसाठी सुरू असलेल्या निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या अर्जातील 71 तर सदस्य पदासाठी 297 उमेदवारांची माघार.

मंगळवेढा - तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीसाठी सुरू असलेल्या निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या अर्जातील 71 तर सदस्य पदासाठी 297 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आखाड्यात सरपंच पदासाठी 47 व सदस्य पदासाठी 316 इतके अर्ज शिल्लक असून रहाटेवाडी व फटेवाडी येथील दोन ग्रामपंचायतीसह 23 सदस्य बिनविरोध निवडल्याची माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली.

आज उमेदवारी अर्ज घेण्याचा अंतिम दिवस असल्यामुळे सरपंच पदासाठी असलेल्या 119 व सदस्य पदासाठी असलेल्या 613 उमेदवारी अर्जातील अनेक उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी गाव पातळीवर नेत्यांनी आपापल्या वार्डातील उमेदवाराला सोयीचे व्हावे यासाठी उमेदवारांशी जवळीक साधून वेगवेगळ्या माध्यमातून त्याचे मन वळवण्याचे प्रयत्न करण्यात आले. अर्ज घेण्याचा आज अंतिम दिवस असल्यामुळे तहसील कार्यालयाला जत्रेच्या स्वरूप प्राप्त झाले होते. महसूल खात्याने निवडणूक प्रक्रिया चोक बजावत आहेत. 18 ग्रामपंचायतीमधील रहाटेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी लक्ष्मण दसाडे तर फटेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी सीमा काळुंगे या बिनविरोध निवडल्या गेल्या.

सर्वाधिक अर्ज पाठकळमध्ये, आठ उमेदवार सरपंचपदाच्या शर्यतीत डोंगरगाव येथे ग्रामदैवत पंचबिबीप्रमाणे सरपंच पदाची लढत पंचरंगी झाली. मारापुर, मारोळी, ढवळस, गुंजेगाव या ठिकाणी तिरंगी लढती तर इतर ठिकाणी दुरंगी लढत सरपंच पदासाठी आहे. सदस्य पदासाठी पाटकळ येथे सर्वाधिक अर्ज राहिले. सदस्य पदाच्या 23 जागा बिनविरोध निघाले आहेत. अर्ज माघारी नंतर उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. उद्यापासून ग्रामपंचायतच्या प्रचाराचा धुमधडाका सुरू होणार आहे. दरम्यान बिनविरोध निघालेल्या रहाटेवाडी ग्रामपंचायत सरपंचासह सदस्याचा सत्कार आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आला. गावनिहाय सरपंचाचे,कंसात सदस्यपदाचे अर्ज खोमनाळ 2 (18), भालेवाडी 2(14), पौट 2(15), बावची 2(18), गुंजेगाव 3(18), ढवळस 3(20), शिरनांदगी 2(19), मारोळी 3(19), रहाटेवाडी 1(6), डोंगरगाव 5(32), हाजापूर 2(9), गोणेवाडी 2 (15), येड्राव 2(18), मारापूर 3(19), सोड्डी 2(18), तळसंगी 2(22), पाठखळ 8(29), फटेवाडी 1(7) असे अर्ज शिल्लक राहिले.

बिनविरोध जागा

हाजापूर :- शांताबाई रजपूत, लक्ष्मी करांडे, रवींद्र जानकर, कांताबाई साखरे, मिराबाई नागणे

मारोळी :- सविता होनमुखे

रहाटेवाडी :- लक्ष्मण दसाडे (सरपंच), महावीर सोनवणे, शकुंतला पवार, प्रदीप पवार, निर्मला पाटील, अश्विनी पाटील, नवनाथ पवार

गोणेवाडी :- शांताबाई बंडगर, अंकुश बंडगर

फटेवाडी :- सीमा काळुंगे (सरपंच), पल्लवी शिंदे, देवाप्पा इंगोले, सुनीता मोटे, शरीफा बारगीर, विनोद अवताडे, हौसाबाई चव्हाण, दत्तात्रय थोरवत

पाठखळ :- ताई गडदे

ढवळस :- पुष्पा गायकवाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.