ऑनलाइन परीक्षेत अडथळा, सोलापूर विद्यापीठाकडे 285 अर्ज

Giving the name of Siddeshwar to Solapur University Issue
Giving the name of Siddeshwar to Solapur University Issue
Updated on
Summary

त्या 285 विद्यार्थ्यांनी आता परीक्षेची पुन्हा संधी मिळावी म्हणून विद्यापीठाकडे अर्ज केले आहेत.

सोलापूर: कोरोनामुळे बहुतेक कामकाज ऑनलाइनच सुरु असल्याने जागोजागी नेटवर्कचा अडथळा जाणवू लागला आहे. जुलै महिन्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेतली. मात्र, रेंज (नेटवर्क) नसल्याने, वीज गेल्याने काहींना परीक्षा देता आली नाही. त्या 285 विद्यार्थ्यांनी आता परीक्षेची पुन्हा संधी मिळावी म्हणून विद्यापीठाकडे अर्ज केले आहेत.

Giving the name of Siddeshwar to Solapur University Issue
प्रांताधिकारी ढोले यांच्याकडे पुण्याचा अन्नधान्य वितरणचा पदभार

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित 110 महाविद्यालयांसह विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मागील महिन्यात पार पडली. कोरोनामुळे मागील दोन वर्षात ऑफलाइन परीक्षाच झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन परीक्षा देण्याची संधी या काळात मिळाली आहे. मात्र, मोबाइल नेटवर्क वारंवार कमी-अधिक होत असल्याचा फटका विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे.

Giving the name of Siddeshwar to Solapur University Issue
सोलापूर ग्रामीणमध्ये आठवड्यात वाढले 3312 कोरोना रुग्ण

विद्यापीठाकडून 50 गुणांची प्रश्‍नपत्रिका ऑनलाइन सोडविण्यासाठी दोन तासांचा वेळ दिला जातो. परंतु, पहिल्यांदा पेपर सोडविताना तो पूर्ण होत असतानाच अनेकांना नेटवर्क केल्याने तो पेपर ऑनलाइन सबमिट करता आलेला नाही. दुसरीकडे पावसामुळे वीज नसल्यानेही विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याची स्थिती आहे. विद्यापीठाकडे जवळपास 285 विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसण्याची पुन्हा एकदा संधी मिळावी म्हणून अर्ज केले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मुलांनी "रेंज'च नसल्याचेच कारण पुढे केल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिली.

Giving the name of Siddeshwar to Solapur University Issue
मंगळवेढ्यात मंदिरावर सायरन व सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा देता आली नाही. विद्यापीठाच्या कुलगुरू व प्र-कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली त्या विद्यार्थ्यांची परीक्षा 14 अथवा 16, 17 ऑगस्टदरम्यान घेण्याचे नियोजन आहे.

- डॉ. विकास कदम, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ

Giving the name of Siddeshwar to Solapur University Issue
भांबेवाडीमध्ये बिबट्याचा शेतातील रस्त्यावरच ठिय्या

मोबाइल कंपन्याकडून लक्ष दिले जाईल का?

टू-जीवरून आता सर्वत्र फोर-जी, 5-G नेटवर्क सुरु झाले आहे. परंतु, दरमहा, त्रैमासिक असो वा अन्य प्रकारचा शेकडो रुपयांचा रिचार्ज करूनही नेटवर्क पुरेशा प्रमाणात मिळत नाही. कस्टमर केअरला कॉल करून तक्रार नोंदविली, तरीही त्याची दखल घेतली जात नाही. सध्याच्या कठीण काळात ग्राहकांकडून कोट्यवधींचा नफा मिळविणाऱ्या कंपन्यांनी नेटवर्कचा अडथळा दूर करण्याचे नियोजन केले आहे का? त्याकडे सरकारचे माहिती व तंत्रज्ञान विभाग लक्ष देईल का? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसह नोकदारांकडून विचारला जात आहे.

Giving the name of Siddeshwar to Solapur University Issue
60 पेक्षा जास्त गावांत उभारली वृक्षारोपणाची चळवळ

चार दिवसांत विद्यापीठाचे सर्व निकाल

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ऑक्‍टोबर 2020 मध्ये घेतलेल्या सर्वच परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. आता जुलैमध्ये झालेल्या परीक्षांचे बहुतेक निकाल जाहीर झाले आहेत. आता पुढील चार दिवसांत लॉ, बी-एड, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विकास कदम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.