Solapur News : आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून तीन ते चार उमेदवार उभे करावेत. एका- एका मतदार संघात एक ते दीड हजार उमेदवार उभे करावेत. कोणत्याही परिस्थितीत सरकारला बॅलेटपेपरवरच निवडणुका घेण्यास भाग पाडावी, अशी रणनीती मराठा समाजाने आखली आहे.
रविवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीचे प्रास्ताविक गणेश देशमुख यांनी केले. यावेळी माऊली पवार, पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, मिलिंद भोसले,
भक्ती जाधव, पंडित ढवण, बालाजी सिरसट,गोविंद पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. रामदास पौळ, संदीप मांडवे, किरण घाडगे, दीपक वाडेकर शिवाजी कदम, बंडू ढवळे, अरविंद केदार यांनी यावेळी विचार व्यक्त केले.
राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला अमान्य असून याचा काहीही उपयोग नाही. हे आरक्षण केंद्र सरकारच्या नोकऱ्यात नाही. विविध शैक्षणिक प्रवेश परीक्षांसाठी व नोकऱ्यांसाठी याचा काहीच उपयोग नाही. यामुळे ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण मिळावे या मागणीवर मराठा समाजाने ठाम राहावे असा निश्चय यावेळी करण्यात आला.
गुणरत्न सदावर्ते यांना सोलापूर मतदारसंघातून भाजपच्या वतीने तिकीट दिले जाण्याचे वृत्त आहे. सदावर्ते यांच्या पाठीशी भाजपच आहे. भाजप स्वतः आरक्षण देते आणि स्वत:च सदावर्ते यांना पुढे करत काढून घेते. मराठा समाजाचा सुरवातीपासूनच आरोप या उमेदवारीमुळे सिद्ध होणार आहे. जर भाजपने सदावर्ते यांना तिकीट दिले तर भाजपचा मराठा समाजाचा कोणता नेता प्रचारासाठी येतो तेच आम्ही पाहू असे आव्हान माऊली पवार यांनी केले.
लोकवर्गणीतून उमेदवार उभे करावेत
प्रत्येक गावातून तीन ते चार तर प्रत्येक मतदारसंघात एक हजार उमेदवार
प्रत्येक घरावर, वाहनावर ‘मी मतदार- मी उमेदवारचा फलक झळकणार
राखीव मतदारसंघासाठी मराठा समाजाच्या पाठिंब्यावरील उमेदवार
अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसांपासून अर्ज भरण्यास प्रारंभ
माढा, सोलापूर व धाराशिव मतदार संघातून उमेदवार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.