Students
StudentsSakal

38 हजार विद्यार्थी नॉट रिचेबल! लसीकरणाचे गूगल फॉर्म भरलेच नाहीत

38 हजार विद्यार्थी मेसेज पाठवूनही नॉट रिचेबल! लसीकरणाचे गूगल फॉर्म भरलेच नाहीत
Published on
Summary

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने संलग्नित 98 महाविद्यालयांमधील 60 हजार विद्यार्थ्यांना गूगल फॉर्म पाठविले आहेत.

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) संलग्नित 98 महाविद्यालयांमधील 60 हजार विद्यार्थ्यांना गूगल फॉर्म (Google Form) पाठविले आहेत. दिवाळीनंतर (Diwali) कॉलेज सुरू होणार असून कोरोना लस (Covid Vaccine) न घेतलेल्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. या पार्श्‍वभूमीवर त्या विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत की नाहीत, याची माहिती गूगल फॉर्ममधून घेतली जात आहे. मात्र, 37 लाख 500 विद्यार्थ्यांनी तो फॉर्मच भरलेला नाही. आता त्या मुलांनी लस टोचून घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर सोपविण्यात आली आहे.

Students
पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी! डिसेंबरनंतर 13 हजार पदांची भरती

दिवाळीनंतर कॉलेज सुरू होणार असून दोन्ही डोस टोचलेल्या विद्यार्थ्यांनाच त्या ठिकाणी उपस्थित राहता येणार आहे. कोरोनापासून तरुण सुरक्षित राहावेत, त्यांच्यापासून कुटुंबातील इतरांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून 'मिशन यूथ हेल्थ' राबविले जात आहे. बहुतेक कॉलेजवर विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. तत्पूर्वी, विद्यापीठ प्रशासनाने 60 हजार विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर (ई-मेल) गूगल फॉर्म पाठविला. त्यामध्ये त्या तरुणाचे नाव, वय, कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचली आहे का, पहिला की दुसरा डोस टोचला आहे, कधी टोचला आहे (तारीख) असे विविध प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे, एकूण विद्यार्थ्यांपैकी 22 हजार 500 विद्यार्थ्यांनीच गूगल फॉर्ममध्ये माहिती भरली असून उर्वरित तरुणांनी काहीच माहिती भरलेली नाही. त्या तरुणांच्या लसीकरणासाठी आता प्रत्येक महाविद्यालयातील प्राध्यापकास 50 विद्यार्थ्यांची जबाबदारी सोपविली जाणार आहे.

महाविद्यालयांमधील प्रत्येक विद्यार्थ्याने कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घ्यावी, या हेतूने प्राचार्यांना पत्र पाठविले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोबाईलवर मेसेज पाठवून लस घेण्याचे आवाहन केले आहे. तरीही, लस न घेणाऱ्यांची यादी काढून दिवाळीनंतर त्यांना प्राध्यापकांच्या मदतीने प्रोत्साहित केले जाईल.

- डॉ. सुरेश पवार, कुलसचिव, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

Students
व्यावसायिक शिक्षण कर्मचाऱ्यांचा दिवाळीत शिमगा!

ग्रामीणमध्ये पहिल्या व दुसऱ्या डोसची सोय हवी

शहरातील नागरी आरोग्य केंद्रांवर ऑन-द स्पॉट आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने पहिला व दुसरा डोस टोचला जातो. मात्र, ग्रामीणमध्ये तसे नियोजन दिसत नाही. गावोगावी लसीकरण मोहीम घेऊन सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित व्यक्‍तींच्या पुढाकारातून तरुणांचे लसीकरण वाढावे म्हणून ठोस नियोजन करावे लागणार आहे. पहिला डोस घ्यायला गेलेल्या व्यक्‍तीला त्या ठिकाणी दुसरा डोस टोचण्याचे सुरू असल्याचे सांगून अनेकदा परत पाठविले जाण्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे एकाच वेळी पहिला व दुसरा डोस देण्याची सोय त्या ठिकाणी करून देणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()