सोलापुरात १२ महिन्यांत ४१६ आगीच्या घटना; ‘MIDC’त अग्निशामक केंद्र होणार; जागा फायनल

अक्कलकोट रोड एमआयडीसीसह निलम नगर, अशोक चौक, विजय नगरातील उद्योगांसाठी आता पाण्याच्या टाकीजवळील जागेत महापालिकेच्या वतीने अग्निशामक केंद्र उभारले जाणार आहे. औद्योगीक वसाहत यंत्रणेने सुचविलेल्या तीन जागांपैकी एक जागा महापालिकेने अखेर निश्चित केली आहे.
Fire Brigade
Fire BrigadeSakal
Updated on

सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीसह निलम नगर, अशोक चौक, विजय नगरातील उद्योगांसाठी आता पाण्याच्या टाकीजवळील जागेत महापालिकेच्या वतीने अग्निशामक केंद्र उभारले जाणार आहे. औद्योगीक वसाहत यंत्रणेने सुचविलेल्या तीन जागांपैकी एक जागा महापालिकेने अखेर निश्चित केली आहे.

सोलापूर शहरात रविवार पेठ, भवानी पेठ, सावरकर मैदान, होटगी रोड व अक्कलकोट रोड या पाच ठिकाणी अग्निशामक केंद्रे आहेत. सध्या अग्निशामक केंद्रांकडे दहा गाड्या असून एक मिनी फायटर वाहन व दोन फोम टेंडर फायर फायटर गाड्या आहेत. अपुरे मनुष्यबळ असतानाही अग्निशामक विभागप्रमुख केदार आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ४१६ आगी विझविण्यात आल्या आहेत. त्यातून एका वर्षात तब्बल अडीच कोटींचा मुद्देमाल देखील आगीपासून वाचविला. मात्र १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या काळात दहा जणांचा आगीत मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.

मागील आर्थिक वर्षांत विशेषतः: जानेवारी ते मार्च या काळात एमआयडीसी परिसरातील उद्योगांमध्ये आगीच्या घटना वाढल्या होत्या. त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुभाष देशमुख यांनी हा मुद्दा उचलून धरला. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने महापालिकेशी पत्रव्यवहार करून तीन जागा सुचविल्या होत्या.

त्या जागांची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आणि पाण्याच्या टाकीजवळील जागा निश्‍चित केली. त्यासंबंधीची माहिती महापालिकेने एमआयडीसीला कळविली असून आता त्याचा कृती आराखडा तयार करायला सुरवात झाली आहे. त्यासाठी लागणारा निधी आता महापालिका किंवा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध केला जाणार आहे.

वर्षातील आगीची स्थिती

  • वर्षाभरातील आगीच्या घटना

  • ४१६

  • आगीतील एकूण नुकसान

  • ४.२२ कोटी

  • एकूण मृत्यू

  • १०

  • आगीपासून बचावलेला मुद्देमाल

  • २.५८ कोटी

जागा अंतिम झाली, आता निधीनंतर कामाला सुरवात

एमआयडीसीतील उद्योगांचे आगीपासून संरक्षण व्हावे म्हणून पाण्याच्या टाकीजवळ स्वतंत्र अग्निशामक केंद्र उभारले जाणार आहे. जागा अंतिम झाली असून जवळील पंपहाऊसमधूनच पाणी घेता येईल. तेथे कायमस्वरूपी दोन गाड्या असणार आहेत.

- केदार आवटे, अग्निशामक विभागप्रमुख, सोलापूर महापालिका

नवीन अग्निशामक केंद्राबद्दल अजून काही...

  • - पाण्याच्या टाकीजवळील चार हजार चौरस स्क्वेअर फुटाची जागा निश्‍चित

  • - एक फायर स्टेशन आणि दोन फायर फायटर गाड्यांची असेल सोय

  • - जवळपास ६५० उद्योगांसाठी नवीन अग्निशामक केंद्राचा होईल फायदा

  • - महापालिकेकडून कृती आराखडा (इस्टिमेट) तयार झाल्यावर ‘डीपीसी’कडे होणार निधीची मागणी

  • - ‘एमआयडीसी’त कोठेही आग लागल्यास अवघ्या ५ मिनिटात मिळेल मदत

  • - आगीच्या दूर्देवी घटनांमधून होणारे सर्व प्रकारचे नुकसान टळण्यास होणार मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.