सोलापूर : जिल्ह्यात कोरोनाचे ५६६ नवे रुग्ण

शहरात २१८ जणांना लागण; प्रशासनाची वाढली चिंता
Solapur Corona Update
Solapur Corona Update Sakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसंख्या (corona patient) अजूनही गंभीर असून, गुरुवारी ग्रामीण भागात ५६६ तर, शहरात २१८ कोरोनाचे रुग्ण आढळले. जिल्ह्यात एकजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.(Solapur Corona Update)

Solapur Corona Update
पारनेरमध्ये फडकणार राष्ट्रवादीचा झेंडा

तिसऱ्या लाटेचे संकट (Third Wave Of Corona)अद्याप कमी झालेले नसून गुरुवारी शहर व जिल्ह्यात एकूण ६८४ रुग्ण आढळले आहेत. यात पंढरपूर आणि बार्शी तालुका आघाडीवर आहे. ग्रामीण भागात आढळलेल्या ५६६ रुग्णांपैकी अक्कलकोट तालुक्‍यात ५, बार्शी ११६ करमाळा ८८, माढा ६४, माळशिरस ५८, मंगळवेढा २६, मोहोळ ३५, उत्तर सोलापूर १७, पंढरपूर १२६, सांगोला ११, दक्षिण सोलापूर येथी २० रुग्णांचा समावेश आहे. सोलापूर शहरात २१८ बाधित आढळले आहेत. (Solapur Corona Update)

Solapur Corona Update
'अमर जवान ज्योती' होणार राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलिन

सुदैवाने शहरात एकही मृत्यू नाही. नागरी आरोग्य केंद्रनिहाय बाधित रुग्णांच्या संख्येत दाराशा व रामवाडी आरोग्य केंद्र आघाडीवर असून या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ४३ रुग्ण बाधित आढळले आहेत. बाळे केंद्रावर ८, भावनाऋषी ९, सिव्हिल ५, देगाव २८, जिजामाता ६, जोडभावी १ मजरेवाडी १, मुद्रा सनसिटी ५, नईजिंदगी १०, साबळे २०, शेळगी९, सोरेगाव १८, विडी घरकुल २ याप्रमाणे बाधित रुग्ण आढळले आहेत. शहरात आज ५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात २३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. म्युकरमायकोसिसचे शून्य रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.