महापालिकेच्या नव्या आकृतिबंधात 650 पदांना कात्री !

महापालिकेच्या नव्या आकृतिबंधात 650 पदांना कात्री !
महापालिकेच्या नव्या आकृतिबंधात 650 पदांना कात्री !
महापालिकेच्या नव्या आकृतिबंधात 650 पदांना कात्री !Esakal
Updated on
Summary

खर्चात बचत करून कामात सुसूत्रता यावी या हेतूने महापालिकेने नवा आकृतिबंध तयार केला आहे.

सोलापूर : खर्चात बचत करून कामात सुसूत्रता यावी या हेतूने सोलापूर महापालिकेने (Solapur Municipal Corporation) नवा आकृतिबंध तयार केला आहे. त्यामध्ये आठ विभागीय अधिकाऱ्यांना सहाय्यक आयुक्‍तांचा दर्जा दिला जाणार असून, अभियंत्याच्या सोबतीला आता कनिष्ठ अभियंता, सहाय्यक हे पद निर्माण केले आहे. भूमापक हे पद रद्द केले असून, शिपाई, लिपिक, मजूर, रोड रोलर चालक, मुकादम जमादार अशी जवळपास 650 पदे रद्द केली जाणार आहेत.

महापालिकेच्या नव्या आकृतिबंधात 650 पदांना कात्री !
मुंबई-पुण्याचा न्याय सोलापूरला का नाही? पालकमंत्र्यांबद्दल नाराजी

महापालिकेला दरवर्षी उद्दिष्टानुसार महसूल मिळालाच नाही. मागील चार-साडेचार वर्षांत उद्दिष्टानुसार महापालिकेच्या उत्पन्नात अकराशे कोटींची तूट सोसावी लागली आहे. आस्थापनावरील खर्च कमी व्हावा, कमी मनुष्यबळात दर्जेदार काम व्हावे, असा आकृतिबंध तयार केल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यात लिपिक, शिपाई व मजुरांची अंदाजित 500 पदे रद्द केली आहेत. त्यांची कामे आता संबंधित मक्‍तेदारांमार्फत केली जाणार आहेत. सहाय्यक आयुक्‍तांची 40 पदे नव्याने भरण्यास मान्यता द्यावी, आठ विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना सहाय्यक आयुक्‍तांचा दर्जा द्यावा, मुकादम जमादार, भूमापक अशी पदे रद्द करावीत, असे त्या आकृतिबंधातून स्पष्ट करण्यात आले आहे. नव्या आकृतिबंधानुसार जवळपास बाराशेपैकी 650 पदे रद्द होतील, असेही विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. या निर्णयामुळे आगामी काळात नगरसेवक, कामगार संघटना आणि प्रशासनातील वाद वाढेल, अशी शक्‍यता वर्तविली आहे.

नगरसेवकांच्या वशिलेबाजीला चाप?

प्रभागातील गरजूंना तथा कार्यकर्त्यांसह त्यांच्या मुलांना नगरसेवकांच्या माध्यमातून अनेकदा नोकरी मिळाल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. परंतु, आता नव्या आकृतिबंधानुसार हा वशिलेबाजीचा प्रकार बंद होणार आहे. अर्ज मागवून परीक्षा पद्धतीनेच योग्य उमेदवारांची निवड होणार आहे. आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर महापालिकेतर्फे पदभरती काढली जाणार आहे. त्यामध्ये अभियंता, कनिष्ठ अभियंता सहाय्यक, उपअभियंता, सहाय्यक आयुक्‍त अशा पदांची वाढ होणार आहे. परीक्षेतून पारदर्शक पद्धतीने उमेदवारांची निवड होणार असल्याने वशिलेबाजीला चाप बसेल, असा विश्‍वास महापालिका प्रशासनाने व्यक्‍त केला आहे.

महापालिकेच्या नव्या आकृतिबंधात 650 पदांना कात्री !
वडवळ येथील मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांसह 39 जणांवर गुन्हा

अभियंत्याला आता कनिष्ठ अभियंत्याचे "सहाय्य'

शहरातील विविध भागातील जमीन अथवा जागांची मोजणी करणे, अतिक्रमण झालेल्या जागेची मोजणी करणे, अशा प्रमुख कामांसाठी भूमापक पदाची निर्मिती झाली. मात्र, आता भूमापक हे पद रद्द करण्यात आले आहे. या विभागाच्या अभियंत्याच्या जोडीला कनिष्ठ सहाय्यक अभियंता दिला जाणार आहे. मजूर, लिपिक, शिपायांची पदेही कमी करण्यात आल्याने मुकादम जमादार हे पद रद्द करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, शहरातील सर्वच प्रकारची कामे स्वत: महापालिकेतर्फे केली जात होती. मात्र, आता मक्‍तेदारांवरच महापालिकेला अवलंबून राहावे लागत असल्याने या पदांची गरज नसल्याचे आकृतिबंधातून दाखविण्यात आले आहे. त्यामुळे तृतीय व चतुर्थश्रेणीतील बरीच पदे कमी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.