Loksabha Election: ८२ वर्षांचे माजी मुख्यमंत्री पुन्हा अॅक्टीव्ह! लोकसभेत काँग्रेसची व्होट बँक वाढणार का?

८२ वर्षांचे नेते काँग्रेसची व्होट बँक वाढवतील का?
Loksabha Election
Loksabha ElectionEsakal
Updated on

जिल्ह्यात मराठा समाजाचे सर्वाधिक मतदार असून त्यानंतर धनगर, लिंगायत, मुस्लिम समाज आहे. मोहोळ, दक्षिण सोलापूर, माळशिरस, करमाळा, सांगोला या मतदारसंघात धनगर तर शहर मध्य, अक्कलकोट व शहर उत्तर येथे लिंगायत व मुस्लिम मतदार निर्णायक आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही, धनगर समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण झालेली नाही. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी नाही, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर काँग्रेसला प्रचाराची मोठी संधी आहे. (Marathi Tajya Batmya)

माजी आमदार ॲड. रामहरी रूपनवर व शहराध्यक्ष चेतन नरोटे हे धनगर नेते काँग्रेसकडे आहेत. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे यांच्या माध्यमातून लिंगायत समाजाला आपलेसे करण्याची संधी आहे. पण, या संधीचे सोनं करण्यात ८२ वर्षाचे सुशीलकुमार शिंदे कितपत यशस्वी होतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.(Latest Marathi News)

- तात्या लांडगे

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात आता केवळ ‘शहर मध्य’ पुरतीच काँग्रेस शिल्लक आहे. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा हे तिन्ही मतदारसंघ काँग्रेसने गमावले आहेत. महापालिकेवरील सत्तादेखील मागच्या वेळी भाजपच्या ताब्यात गेली होती. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेसला करता आलेला नाही.(Marathi Tajya Batmya)

सोलापूर लोकसभा दोन टर्म झाले भाजपच्याच ताब्यात आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर काँग्रेस आशादायी बनलेली असतानाच जिल्ह्याच्या काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची स्थिती आहे. अशा परिस्थितीत सोलापूर लोकसभेची जबाबदारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Loksabha Election
Nashik Crime News: पंचवटीत किरकोळ वादातून हाणामारी अन् एकाची हत्या...

‘शहर मध्य’बरोबरच इतर तिन्ही मतदारसंघात काँग्रेसचे आमदार निवडून आणण्याची व सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. सोलापूर महापालिकेची गेलेली सत्ता देखील काँग्रेसला मिळवावी लागणार आहे. ‘नको नको’ म्हणत पुन्हा राजकारणात सक्रिय झालेल्या सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांचे अस्तित्व व नेतृत्व आगामी निवडणुकांच्या निकालावरून सिद्ध होणार आहे.(Marathi Tajya Batmya)

Loksabha Election
Balu Dhanorkar: बाळू धानोरकरांच्या जागी कोण लढणार? काँग्रेसमधून 7 नेत्यांची नावे चर्चेत

महिलांची फळी विस्कटलेलीच

काँग्रेसने जिल्हाध्यक्ष म्हणून पुन्हा शाहीन शेख व शहराध्यक्ष म्हणून हेमा चिंचोळकर यांना संधी दिली. प्रदेशवर माजी महापौर अलका राठोड या आहेत. पण, जाई-जुई विचारमंचच्या माध्यमातून २००९ च्या सुमारास आमदार प्रणिती शिंदे यांनी शहरात फार मोठे काम उभारले होते. अनेक महाविद्यालयातील तरूणींसह शहरातील विविध क्षेत्रातील महिला त्या विचारमंचशी जोडल्या गेल्या. (Latest Marathi News)

त्यात काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केलेल्या ज्योती वाघमारे यांचाही समावेश होता. पण, सध्या काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांचा ना मोठा मेळावा झाला, ना बोलावलेल्या बैठकीला अपेक्षित गर्दी पाहायला मिळाली. आगामी निवडणुकांमध्ये महिलांचे संघटन मजबूत करणे अपेक्षित आहे. कारण भविष्यात आंदोलनासाठी पैसे देऊन काही तासांसाठी जमवलेली गर्दी काँग्रेसला परवडणारी नाही, अशी चर्चा आहे.(Marathi Tajya Batmya)

Loksabha Election
Conversion Case: धक्कादायक! मुंब्रा भागात 400 जणांचं धर्मांतर? राज्यात खळबळ

पक्षांतर करणाऱ्यांना थांबवणारा नेताच नाही?

मागील काही महिन्यात माजी महापौर यू. एन. बेरिया, नलिनी चंदेले, माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पक्षांतर केले. शहराध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर प्रकाश वाले, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि तालुकाध्यक्ष निवडीत डावलेले अनेकजण पक्षावर नाराज आहेत. पक्षात इनकमिंगच्या तुलनेत आऊटगोईंगच जास्त आहे. तरीसुद्धा पक्षातील कोणताच नेता त्याकडे गांभीर्याने पाहत नाही.(Marathi Tajya Batmya)

नाराजीतून पक्षांतर करणाऱ्यांना थांबविणारा तेवढा तगडा नेता जिल्ह्यात नाही, अशी काँग्रेसची सद्य:स्थिती आहे. जिल्ह्यातील नेत्यांनी मुंबईसह राज्यभर दौरे करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करून सत्ता मिळवणे कठीण आहे. त्यासाठी पक्षसंघटन मजबूत करावे लागणार आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.