सोलापूर जिल्ह्यातील 91 लसीकरण केंद्रे बंद

सोलापूर जिल्ह्यातील 91 लसीकरण केंद्रे बंद
Updated on
Summary

सोलापूर जिल्ह्यातील 30 लाख 79 हजार 406 व्यक्‍तींचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत त्यापैकी पाच लाख 74 हजार 599 जणांचेच लसीकरण पूर्ण झाले आहे. मागील तीन दिवसांत लस न मिळाल्याने आता 12 हजार जणांना लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यातील 91 लसीकरण केंद्रे बंद आहेत.

सोलापूर : जिल्ह्यातील 30 लाख 79 हजार 406 व्यक्‍तींचे लसीकरण (vaccination) होणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत त्यापैकी पाच लाख 74 हजार 599 जणांचेच लसीकरण (vaccination) पूर्ण झाले आहे. मागील तीन दिवसांत लस न मिळाल्याने आता 12 हजार जणांना लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करावी लागणार आहे.(91 vaccination centers in solapur district are closed)

सोलापूर जिल्ह्यातील 91 लसीकरण केंद्रे बंद
भवितव्य अंधारात! पाच लाख विद्यार्थ्यांकडे नाहीत मोबाईल
Sakal

कोरोनाच्या दोन्ही लाटात शहर-जिल्ह्यातील चार हजार 395 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख 63 हजार 157 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आता तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविल्याने कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवरील गर्दी वाढली आहे. शहरातील 21 तर ग्रामीण भागातील 70 केंद्रांवरून लसीकरण सुरू आहे. दरम्यान, प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची बाधा झाल्यास संबंधित रुग्ण अत्यवस्थ होत नाही तथा त्याचा मृत्यू होत नसल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या एकाही रुग्णाचा दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला नसल्याचाही दावा आरोग्य विभागाने केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 91 लसीकरण केंद्रे बंद
सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद
Google file photo

या पार्श्‍वभूमीवर लसीकरण केंद्रांबाहेर रांगा लागत आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यासाठी 23 जूननंतर लसीचा एकही डोस मिळालेला नाही. मागील तीन दिवसांपासून लसीकरण बंद असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. तर कोविशिल्ड लस टोचून 84 दिवस पूर्ण झालेल्यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. लसीचा तुटवडा सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आहे. जिल्ह्यासाठी लस मिळेल, असा कोणताही निरोप अजूनपर्यंत आला नसल्याची माहिती लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरूध्द पिंपळे यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील 91 लसीकरण केंद्रे बंद
सोलापूर विद्यापीठाची 5 जुलैपासून परीक्षा
Sakal

-----------------------------------------------------

लसीकरणाचे टार्गेट अन्‌ लस टोचलेले

--------------------------------------------------------

लाभार्थी... टार्गेट... लस घेतलेले

---------------------------------------------------------

हेल्थ वर्कर्स... 41,888... 41,888

फ्रंटलाईन वर्कर्स... 75,717... 75,717

45 ते 59 वर्षे... 10,80,360... 2,17,237

60 वर्षांवरील... 3,19,369... 1,99,821

18 ते 44 वयोगट... 16,79,677... 39,936

--------------------------------

सोलापूर जिल्ह्यातील 91 लसीकरण केंद्रे बंद
'या' पंचसुत्रीमुळेच कमी झाली दुसरी लाट! सोलापूर कोरोनामुक्‍तीकडे

120 दिवसांपर्यंत घेता येईल दुसरा डोस

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी आता 84 दिवसांपर्यंत केला आहे. तर कोवॅक्‍सिन लसीचा दुसरा डोस एक महिन्यात (30 दिवसांत) दिला जातो. मात्र, जिल्ह्यासाठी मागील तीन दिवसांपासून लस न मिळाल्याने पहिला डोस घेऊन 84 दिवस झालेल्यांना दुसरा डोस घेण्यासाठी लस मिळत नसल्याचे शहर-ग्रामीणमध्ये चित्र आहे. दरम्यान, 84 दिवसांपासून ते 120 दिवसांपर्यंत दुसरा डोस घेतला तरी चालतो, अशी माहिती डॉ. पिंपळे यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.