उघड्यावरील पाणी आता नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागले आहे.
सोलापूर : शहराचा पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने बहुतेक नागरिक मोठमोठ्या बॅरेलमध्ये पाणी साठवून ठेवतात. उघड्यावरील पाणी आता नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. आतापर्यंत 360 व्यक्तींमध्ये डेंगीची (Dengue) लक्षणे आढळली असून त्यात 92 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने (Health Department) घरोघरी जाऊन पाण्याच्या नमुन्यांची तपासणी सुरू केली आहे. (In Solapur, 92 people have a Dengue disease in check of 360 suspects-ssd73)
डेंगी हा डास स्वच्छ पाण्यावर वाढतो. शहरातील विशेषत: जुळे सोलापूर, न्यू पाच्छा पेठ, होटगी रोड, गैबीपीर झोपडपट्टी या परिसरात डेंगीचे डास मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. दरम्यान, पावसाळ्यातही नागरिकांना तीन- चार दिवसांआड पाणी मिळते. त्यामुळे अनेकजण बॅरेल, टॅंक भरून ठेवतात. घरासमोर, मोकळ्या जागेत कुंड्यांमध्ये झाडे लावण्यात आली आहेत. कुंड्यांत पाणी साचत असल्याने त्या ठिकाणी डेंगीचे डास तयार होत असल्याचे चित्र आरोग्य विभागाला पाहायला मिळाले. शहरातील दोन लाखांहून अधिक लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. 41 हजार घरांमधील दोन हजार 582 टॅंकमधील पाणी दूषित आढळले आहे. तसेच आतापर्यंत साडेतीनशेहून अधिक व्यक्तींमध्ये डेंगीची लक्षणे (Symptoms of dengue) आढळली असून त्यातील 92 जणांना डेंगी झाल्याचे समोर आले आहे. आता जवळपास 90 पेक्षाही अधिक संशयितांचे रक्ताचे नमुने मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले आहेत. 15 दिवसांतून एकदा संशयितांचे रिपोर्ट महापालिकेला कळविले जात आहेत, असेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
डासांच्या आजारापासून "असे' राहा दूर
आठवड्यातून एक दिवस सर्वांनी कोरडा दिवस पाळावा
घरासमोर पाणी साचू देऊ नका, घर व परिसर स्वच्छ ठेवा
पाण्याचे टॅंक तथा बॅरेल स्वच्छ ठेवा, टॅंक उघडे ठेवू नका
सायंकाळी दरवाजे, खिडक्या बंद करून ठेवाव्यात; खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात
झाडांच्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नका; त्या ठिकाणी स्वच्छता असावी
घरातील फ्रिज, कुलरमधील पाणी वारंवार बदलावे
डेंगी कसा ओळखावा..?
सर्दी, ताप आणि वारंवार खोकला येतो
अंगावर लहान-लहान पुरळ येतात
जेवल्यावर अथवा जेवण केलेले नसतानाही उलट्या अन् मळमळ होते
रक्तातील प्लेटलेट्स कमी होऊन अशक्तपणा जाणवतो
पावसाळ्यात डेंगी, मलेरिया, चिकुन गुनिया असे डासांपासून होणारे आजार वाढतात. आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुरू आहेत, परंतु नागरिकांनी खबरदारी म्हणून घर व परिसर स्वच्छ ठेवावा आणि पाणी उघडे ठेवू नये. घरासमोर झाडे लावल्यानंतर नागरिकांनी त्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नये. डासांच्या बहुतेक अळ्या त्याच ठिकाणी आढळत आहेत.
- पूजा नक्का, जीवशास्त्रज्ञ, सोलापूर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.