सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची 990 कोटींच्या समांतर जलवाहिनीला 8 ठिकाणी आडकाठी! ‘फॉरेस्ट’ची परवानगी मिळेना अन् शेतकऱ्यांच्या मोबदल्यामुळे थांबले काम

सोलापूर शहराचा विस्कळित पाणीपुरवठा सुधारण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूर ते पुणे अशी ११० किलोमीटर समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. त्यासाठी ९९० कोटींचा खर्च केला जात आहे. सहा महिन्यांत १०० किमी काम पूर्ण करण्यात आले, पण आता काम संथगतीने सुरू आहे.
solapur
उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचा प्रश्‍नSakal
Updated on

सोलापूर : सोलापूर शहराचा विस्कळित पाणीपुरवठा सुधारण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूर ते पुणे अशी ११० किलोमीटर समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. त्यासाठी ९९० कोटींचा खर्च केला जात आहे. सहा महिन्यांत १०० किमी काम पूर्ण करण्यात आले, पण आता काम संथगतीने सुरू आहे. त्यासाठी आठ ठिकाणी अडथळे असल्याची बाब समोर आली आहे.

सोलापूर शहरातील नागरिकांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागावा यासाठी समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. हे काम पूर्ण झाल्यावर सोलापूरकरांना किमान दोन दिवसाआड तरी पाणी मिळेल अशी आशा आहे. २० वर्षांपासून सोलापूरकरांना नियमित पाण्याची अपेक्षा आहे. सध्या जुन्याच पाइपलाइनमधून सोलापूरकरांना पाणी मिळते, पण त्याला सतत गळती लागते आणि पाणीपुरवठा विस्कळित होतो अशी वस्तुस्थिती आहे.

सणासुदीत किंवा पावसाळा, उन्हाळा, हिवाळा असो, सोलापूरकरांना नियमित पाणी मिळत नाही. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न मार्गी लावावाच लागणार आहे. ११० पैकी १० किमी राहिलेल्या कामाला निर्माण झालेल्या अडथळ्यांवर प्रशासन लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कशा पद्धतीने मार्ग काढणार, मुदतीत जलवाहिनीचे काम होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जलवाहिनीच्या कामातील अडथळे

  • टेंभुर्णी बायपासजवळ खासगी जमिनीतून १८०० मीटर पाइपलाइन जाणार असून त्याच्या मोबदल्याचा विषय अजून मिटलेला नाही

  • हिवरे, खंडाळी, पाकणी येथील वन विभागाच्या जागेतून पाइपलाइन टाकावी लागणार असून वन विभागाकडून अजून त्यासाठी परवानगी मिळालेली नाही

  • उजनी बायपासजवळ ८०० मीटर जागेतून पाइपलाइन नेण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा मोबदल्यावरून वाद सुरु आहे

  • वरवडे टोल नाक्याजवळील ५०० मीटर अंतरातील जागेतून पाइपलाइन नेण्यास तेथील स्थानिकांचा विरोध असून त्यांना हायवेकडून मोबदला मिळाला नाही

  • सोलापूर शहराजवळील देशमुख वस्ती परिसरातील शिवरस्त्यालगत पाइपलाइन टाकली जाणार असून तेथील शेतकरी मोबदला मागत आहेत

  • मोहोळजवळ (कुरुल- कामती रोडलगत) २५० मीटर अंतरावरील शेतकरी म्हणतात, जुन्या ‘हायवे’वेळी आम्हाला मोबदला मिळाला नाही

वेळेत जलवाहिनीचे काम पूर्ण होईल

महापालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समांतर जलवाहिनीचे काम गतीने सुरू असून नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण होईल, असा विश्वास आहे. वन विभागाकडून काही दिवसांत परवानगी अपेक्षित असून उर्वरित प्रश्न देखील काही दिवसांत मार्गी लागतील.

- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, महापालिका, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.