लातूरमधील ६४ वर्षीय ब्रेनडेड महिलेमुळे एकास दृष्टी, तर तिघांना जीवनदान

लातूर येथील शामनगरातील ६४ वर्षीय महिला त्यांच्या राहत्या घरी चक्कर येऊन डोक्यावर पडल्या होत्या. त्यांना २३ जुलैला उपचारासाठी लातूरमधील अल्फा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथून त्यांना सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलला आणले. पण, रुग्णाचा मेंदू काम करत नसल्याने रुग्णाच्या नातेवाइकांना अवयवदानाची माहिती दिली. त्यानंतर यशोधरा हॉस्पिटलमध्ये अवयवदानाची प्रक्रिया पार पडली.
solapur yashodhara hospital
solapur yashodhara hospitalsakal
Updated on

सोलापूर : लातूर येथील शामनगरातील ६४ वर्षीय महिला त्यांच्या राहत्या घरी चक्कर येऊन डोक्यावर पडल्या होत्या. त्यांना २३ जुलैला उपचारासाठी लातूरमधील अल्फा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथून त्यांना सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलला आणले. पण, रुग्णाचा मेंदू काम करत नसल्याने रुग्णाच्या नातेवाइकांना अवयवदानाची माहिती दिली. त्यानंतर यशोधरा हॉस्पिटलमध्ये अवयवदानाची प्रक्रिया पार पडली.

राहत्या घरी काम करीत असताना शामनगर (लातूर) येथील महिलेला चक्कर आली आणि अचानकपणे ती जोरात डोक्यावर पडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नातेवाइकांनी त्या महिलेला तातडीने लातूरमधील अल्फा हॉस्पिटलला नेले. पण, त्यानंतर त्या महिलेला २४ जुलै रोजी रात्री ११ वाजता सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात आणले. उपचारादरम्यान रुग्ण मेंदूमृत असल्याचे डॉक्टरांनी २६ जुलैला पहाटे पावणेचार वाजता घोषित केले. त्या रुग्णाच्या अवयवयामुळे तिघांचे जीव वाचू शकतात, तर दोघांना पूर्ण दृष्टी मिळेल, असे डॉक्टरांनी त्या रुग्णाच्या नातेवाइकांना सांगितले. रुग्णाच्या नातेवाइकांनी संमती दिल्यानंतर यशोधरा हॉस्पिटलमध्ये अवयवदानाची प्रक्रिया पार पडली. त्यासाठी यशोधरा हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. बसवराज कोल्लूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. निलरोहित पैके, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. विपुल पाठक, डॉ. मुक्तेश्वर शेटे, डॉ. आशिष भुतडा, डॉ. प्रीतेश पवार यांनी अवयवदानाचे काम पाहिले. प्रत्यारोपण समन्वयक सुकांत बेळे, भीमराव देशपांडे, डॉ. अक्षय शेंदरे, नर्सिंग स्टाफ व अन्य कर्मचाऱ्यांनीही त्यासाठी परिश्रम घेतले.

ग्रीन कॉरिडॉरमुळे रुग्णवाहिका दोन तासांत पुण्याला
पुण्यातील विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीकडून रुग्णांना अवयव देण्यास परवानगी मिळाली. त्यानुसार एक किडनी ‘यशोधरा’मधील नोंदणीकृत रुग्णाला, दुसरी किडनी पुण्यातील पूना हॉस्पिटलला देण्यात आली. रुग्णाचे लिव्हर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलला देण्यात आले. रुग्णाचे कॉर्नियाही (डोळे तथा दृष्टिपटल) दान करण्यात आले. ग्रीन कॉरिडॉरमुळे महिलेची एक किडनी व लिव्हर हे अवयव अवघ्या दोन तासांत पुण्याला पोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.