वडवळ येथील मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांसह 39 जणांवर गुन्हा

वडवळ येथील मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांसह 39 जणांवर गुन्हा
Wadval
WadvalCanva
Updated on
Summary

वडवळ येथील नागनाथ मंदिर येथे दर अमावास्येला भक्त शेकडोंच्या संख्येने गर्दी करत आहेत.

मोहोळ (सोलापूर) : कोरोना (Covid-19) महामारीच्या पार्श्वभूमीवर मंदिरे, प्रार्थनास्थळे व अन्य गर्दीच्या ठिकाणांवर शासनाने बंदी घातली आहे. मात्र मोहोळ तालुक्‍यातील (Mohol Taluka) (जिल्हा सोलापूर) (Solapur) वडवळ (Wadval) येथील नागनाथ मंदिर याला अपवाद असून दर अमावास्येला भक्त शेकडोंच्या संख्येने गर्दी करत आहेत. मंदिर समितीच्या या भूमिकेबद्दल तालुका प्रशासन सोयीस्करपणे डोळेझाक करत आहे. दरम्यान, मंदिर समिती व दुकानदार यांच्यासह एकूण 39 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक सायकर (Police Inspector Ashok Saikar) यांनी दिली.

Wadval
सोलापूरकरांचे हात गुंतले लस निर्मितीत

वडवळ येथील नागनाथ मंदिर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील भक्त देखील या ठिकाणी दर्शनाला येत असतात. कोरोनामुळे सध्या राज्यातील सर्वच मंदिरे व प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे भक्तांची गर्दी आटोक्‍यात येऊन कोरोना महामारी व काही प्रमाणात का असेना पण नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. मात्र वडवळ येथील नागनाथ मंदिर समितीने सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नागनाथ मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले ठेवले आहे. त्यामुळे दर अमावास्या व सोमवारच्या दिवशी मंदिर परिसरामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. भक्तांची ही वाढती गर्दी वडवळ गावकऱ्यांच्या जीवावर उठण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

आतापर्यंत वडवळमध्ये सुमारे 25 ते 30 गावकऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 100 हून अधिक नागरिक संक्रमित झाले आहेत. यामध्ये मंदिराचे मुख्य पुजारी महादेव शिवपूजे व त्यांच्या मातोश्री यांचेही निधन झाले आहे. तरीही अमावास्येला येणारे भक्त पैसे देतात, पावत्या फाडतात म्हणून लालसेपोटी मंदिर खुले ठेवण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात प्रशासनाला वेळोवेळी सूचना देऊनही मंदिर समितीवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासन व मंदिर समिती यांचा अनागोंदी कारभार सुरू आहे. श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची गर्दी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कठोर पावले उचलून मंदिर समितीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Wadval
सोने व्यापाऱ्याच्या सतर्कतेने दरोडेखोर गजाआड

दरम्यान, मोहोळ पोलिस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेत मंदिर समितीला मंदिर बंद करण्यास भाग पाडले. तसेच वडवळकडे येणाऱ्या व जाणाऱ्या भक्तांना वडवळ गावच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडून नागनाथ मंदिर समितीच्या 13 जणांवर तर बेकायदेशीर दुकाने सुरू ठेवणाऱ्या 26 अशा एकूण 39 जणांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथीचे रोग प्रतिबंधक अन्वये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली आहे. हवालदार महेश राजेंद्र कटकधोंड मोहोळ फिर्याद दिली.

वडवळ येथील नागनाथ मंदिराचे पुजारी, मंदिर प्रशासनाचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना कोविड-19 चे नियम यापूर्वीच समजावून सांगितले आहेत. तशी नोटीस देखील त्यांना देण्यात आली आहे. तरी देखील मंदिर समितीने अमावास्येनिमित्त मंदिर खुले ठेवल्यामुळे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे मंदिर समिती, पुजारी व मंदिर परिसरातील दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अशोक सायकर, पोलिस निरीक्षक, मोहोळ

गुन्हा दाखल झालेले मंदिर समितीचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे

श्रीकांत महादेव शिवपूजे, शाहीर श्रीहरी पवार, भाऊसाहेब यशवंतराव देशमुख, नागनाथ भोजा शिवपूजे, संतोष विश्वनाथ शिवपूजे, गणेश मारुती मोरे, चंद्रकांत आप्पा शिवपूजे, महेश रेवण कोटीवाले, सुभाष नागनाथ शिवपूजे, धनाजी नामदेव पवार, बाळासाहेब बाबाजी शिवपूजे, रघुनाथ कृष्णाजी मोकाशी व मंदिराचे पुजारी सागर नागनाथ शिवपूजे (सर्व रा. वडवळ, ता. मोहोळ).

या दुकानदारांवर झाला गुन्हा दाखल

रवी पोपट शिवपूजे, राजकुमार तुकाराम मोरे, ऋषीकेश आण्णासाहेब मोरे, शिवाजी सदाशिव शिवपूजे, शहाजी तुकाराम मोरे, अमोल देविदास लेंगरे, नागेश महादेव शिवपूजे, कल्याण जालिंदर मोरे, ताराबाई लक्ष्मण बाबर, पुष्पा राजेंद्र मराडे, लखन देविदास लेंगरे, महमद ताबोळी, देविदास मारुती लेंगरे, लक्ष्मण निवृत्ती बाबर, राणी सोमनाथ शिवपूजे, नितीन लक्ष्मण शिवपूजे, हणमंत श्रीरंग मोरे, बाळासाहेब मनोहर लेंगरे, पृथ्वीराज चंद्रकांत शिवपूजे, दत्तात्रय यशवंत मधवे, नागेश दगडू कोळी, गणेश दगडू कोळी, धनाजी भागवत नरके, संतोष अशोक नरळे (सर्व रा. वडवळ, ता. मोहोळ).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.