कोरोना नियमांचं उल्लंघन! आमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल

आमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल! विवाहास क्षमतेपेक्षा जास्त गर्दी
आमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल! विवाहास क्षमतेपेक्षा जास्त गर्दी
आमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल! विवाहास क्षमतेपेक्षा जास्त गर्दीCanva
Updated on
Summary

मर्यादेपेक्षा जास्त गर्दी जमविल्याप्रकरणी त्यांच्या दोन मुलांसह आयोजकांच्या विरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बार्शी (सोलापूर) : येथील लातूर रस्त्यावर लक्ष्मी - सोपान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut) यांच्या दोन मुलांचा रविवारी विवाह सोहळा संपन्न झाला होता. विवाह सोहळ्यात कोरोना (Covid-19) नियमांचे उल्लघन झाले. मर्यादेपेक्षा जास्त गर्दी जमविल्याप्रकरणी त्यांच्या दोन मुलांसह आयोजकांच्या विरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (A case has been registered against both the children of MLA Raut-ssd73)

आमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल! विवाहास क्षमतेपेक्षा जास्त गर्दी
कॉंग्रेसमधलं बंड !

कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, रणजित राऊत, आयोजक योगेश पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस अमोल वाडकर यांनी फिर्याद दाखल केली असून, रणवीर व रणजित हे आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र आहेत. बार्शी येथे 25 जुलै रोजी सायंकाळी पावणे सातच्या दरम्यान विवाह सोहळा झाला. विवाहासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार नीलेश राणे, माजी मंत्री सुभाष देशमुख, खासदार रणजितसिंह निंबाळकर, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सचिन कल्याणशेट्टी, धनाजी साठे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.

आमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल! विवाहास क्षमतेपेक्षा जास्त गर्दी
कापूस निर्यात धोरणामुळे वस्त्रोद्योगाला फटका !

विवाहासाठी आयोजकांनी रीतसर परवानगी घेतली होती. नाहरकत पत्राद्वारे 40 जणांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात येऊन सामाजिक अंतर, प्रत्येकास मास्क वापरणे याबाबत लेखी कळविण्यात आले होते. मात्र विवाहस्थळी पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता क्षमतेपेक्षा जास्त व मास्कचा वापर होत नसल्याचे दिसून आले. त्या वेळी आयोजकांवर फक्त गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी नंतर रणवीर राऊत व रणजित राऊत यांची नावे गुन्ह्यामध्ये घेतली आहेत. साथीचे रोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र कोविड विनियमन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, तपास पोलिस हवालदार अजित वरपे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.