शहरातील सुभाषनगर भागातील वाणी प्लॉट येथे राहत्या घरामध्ये मुलानेच आईच्या डोक्यामध्ये दगड घालून खून केला.
बार्शी (सोलापूर) : शहरातील सुभाषनगर भागातील वाणी प्लॉट येथे राहत्या घरामध्ये मुलानेच आईच्या डोक्यामध्ये दगड घालून खून (Crime) केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घराबाहेर फरफटत आणून प्लास्टिकमध्ये गुंडाळून झुडपामध्ये टाकून दिल्याची घटना तब्बल तीन दिवसांनी उघडकीस आली आहे. बार्शी शहर पोलिस ठाण्यात (Barshi City Police Station) मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीराम नागनाथ फावडे (वय 21) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. पोलिस हवालदार अरुण माळी यांनी फिर्याद दाखल केली आहे. रुक्मिणी नागनाथ फावडे (वय 45) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान उघडकीस आली. वाणी प्लॉट येथील विशाल वाणी यांनी मंगळवारी सकाळी झुडपामध्ये मृतदेह दिसताच पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षकांसह पथकाने घटनेची पूर्ण माहिती घेऊन पंचनामा केला.
रुक्मिणी यांच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता, घरातील गादीवर रक्त सांडलेले होते, दगडांचे लहान तुकडे गादीवर, बाजूला पडलेले दिसले. तसेच मृत महिला रुक्मिणी फावडे यांना कोणीतरी बाहेर कंपाउंडपर्यंत ओढत नेल्याचे निशाण दिसत आहेत. रुक्मिणी यांच्या डोक्यात मोठा दगड मारल्याने कवटी फुटून रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक अहवालात निष्पन्न झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाणी प्लॉट येथे रुक्मिणी व त्यांचा मोठा मुलगा श्रीराम फावडे एकत्र राहात होते. लहान मुलगा व पती यांचे भांडण होत असल्याने ते डमरे गल्ली येथे वेगळे राहात होते. श्रीराम व रुक्मिणी यांच्यात पैशावरून नेहमी वाद होत. याबाबत शहर पोलिसात तक्रारी दाखल आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलिस निरीक्षक रामदास शेळके करीत आहेत.
दरम्यान, रुक्मिणी फावडे यांची जमीन विक्री करून पाच लाख रुपये आले होते. मुलगा श्रीराम तिच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. चार महिन्यांपूर्वी रुक्मिणी यांना मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसांत मुलाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.