कोन्हेरी येथील नवरदेवासह आई, वडील व मुलीची आई, अशा चार जणांवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मोहोळ (सोलापूर) : पेनूर येथील एका नऊ वर्षांच्या लहान मुलीबरोबर बालविवाह (Child Marriage) करून देवकार्यासाठी तीर्थक्षेत्राला गेलेल्या कोन्हेरी येथील नवरदेवासह आई, वडील व मुलीची आई, अशा चार जणांवर मोहोळ पोलिस ठाण्यात (Mohol Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता. 11) रात्री उशिरा घडली. मुलगी व मुलीची आई बेपत्ता असून, पोलिस पथक त्यांचा शोध घेत आहेत. (A case of child marriage with a nine-year-old girl has been registered in Mohol)
पेनूर (ता. मोहोळ) (Mohol) येथील मामाच्याच एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर 30 नोव्हेंबर रोजी कोन्हेरी येथील नात्यातीलच अविनाश दाजी शेळके याने मुलीची आई व आपले आई - वडील यांच्या संगनमताने बालविवाह केला. दरम्यान, हे नवविवाहित देवदर्शनासाठी तीर्थक्षेत्राला गेले होते. त्या ठिकाणचे काही फोटो नवरदेवाने त्याच्या मोबाईलवर 'आय लव्ह बायको' असे लिहून फेसबुकसह (Facebook) स्टेटसला ठेवले होते. त्या फोटोचा स्क्रीनशॉट काढत अज्ञात व्यक्तीने सोलापूर (Solapur) येथील महिला व बाल विकास कार्यालयातील चाईल्ड लाइन (Child Line) 1098 या संपर्क क्रमांकावर फोन करत या बालविवाहाची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, सदस्य योगेश स्वामी, दत्तात्रय शिर्के यांच्या पथकाने मोहोळ पोलिस ठाण्याशी संपर्क केला. त्या ठिकाणाहून पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेऊन कोन्हेरी येथे जाऊन चौकशी केली. संबंधित तरुणाने नातेवाइकाच्याच नऊ वर्षाच्या मुलीबरोबर विवाह केल्याचे लक्षात आल्यानंतर दाजी भीमराव शेळके, तारामती दाजी शेळके व नवरदेव अविनाश दाजी शेळके तसेच पीडित मुलीची आई यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये अतुल वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुलीची आई व पीडित मुलगी सध्या बेपत्ता असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.