मे 2010 पासून पतीसह सासरच्यांनी छळ केला. पहिला विवाह माझ्यासोबत झाला असून कायदेशीर घटस्फोट न घेताच पतीने दुसरा विवाह केला, अशी फिर्याद पहिल्या पत्नीने दिली.
सोलापूर : विवाहानंतर सहा महिन्यांनी पतीने कोणत्या ना कोणत्या कारणावरून शिवीगाळ, भांडण सुरू केले. दारू पिऊन येऊन विवाहात माहेरच्यांनी मानपान केला नाही, जास्त सोने दिले नाही, हुंडा दिला नाही म्हणून मारहाण केली. मे 2010 पासून पतीसह सासरच्यांनी छळ केला. पहिला विवाह माझ्यासोबत झाला असून कायदेशीर घटस्फोट न घेताच पतीने शैलजा मिठ्ठापल्ली हिच्याशी दुसरा विवाह केला, अशी फिर्याद सुजाता अंबादास कुरापाटी (रा. नेताजी नगर, जोडभावी पेठ) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार पती अंबादास कुरापाटी, सासू बाललक्ष्मी कुरापाटी, सासरा बसय्या कुरापाटी (सर्वजण रा. बळकोटे नगर, अक्कलकोट), अंबिका चंद्रकांत अली, सुप्रिया केदार-झांबरे यांच्याविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाई शैलेश बुगड हे करीत आहेत.
घरात कोंडल्याने महिलेविरुद्ध गुन्हा
घरात पत्नी व दोन नातवंडांसह मी घरात होतो. त्यावेळी माझ्या खोलीला कुलूप का लावले म्हणून सुलोचना ऊर्फ सोनाली संजय जंगलगी (रा. पाटील नगर, सैफूल) हिने शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करून घराला कुलूप व गेटलाही कुलूप लावून आम्हाला सोनालीने घरात कोंडले, अशी फिर्याद भीमाशंकर पिरप्पा जंगलगी (रा. स्वामी विवेकानंद नगर भाग-दोन, सैफूल) यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणात सोनाली जंगलगी हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
आईला न सांभाळणाऱ्या मुलांविरुद्ध गुन्हा
वयस्कर झालेल्या आईचा सांभाळ न करता तिला घराबाहेर हाकलून देणाऱ्या दोन मुलांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. भोजप्पा सिद्राम मंजुळे व नामदेव सिद्राम मंजुळे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत. रामबाई सिद्राम मंजुळे (रा. कुमठा नाका) यांनी मुलांविरुद्धच पोलिसांत धाव घेतली आहे.
रामबाई या इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव (देवकरवस्ती) येथे राहात होत्या. निराधार, हताश झाल्याने त्या सोलापुरातील मुलांकडे आश्रयासाठी आल्या. 2018-19 पासून दोन्ही मुले त्यांना सांभाळत नाहीत. मुलांनी होटगी येथील घरजागा विकून टाकली. आता दोन्ही मुले कुमठा नाका व शास्त्री नगरातील माझ्या नावावरील जागेत राहायला आहेत. तरीही, ते माझा सांभाळ करीत नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारी पेन्शनदेखील मुलगा भोजप्पा घेऊन जातो. त्याच्या घरात जाण्याचा प्रयत्न केल्याने त्याने शिवीगाळ करीत मारहाण केली. पालनपोषण न करता त्याने हाकलून दिले, असे रामबाई मंजुळे यांनी पोलिसांना सांगितले. दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलिस नाईक मुजावर हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.