शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन ! विष प्राशन करण्याची धमकी

शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन ! विष प्राशन करण्याची धमकी
शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन ! विष प्राशन करण्याची धमकी
शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन ! विष प्राशन करण्याची धमकीCanva
Updated on
Summary

उतारा दुरुस्त केल्याशिवाय खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेत शेतकऱ्याने, सोबत विषाची बाटली आहे. उतारा दुरुस्त न केल्यास ती पिऊन वरून उडी मारतो, असा इशारा दिला.

सोलापूर : सात-बारा उतारा दुरुस्ती करून मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील (Collector Office) टॉवरवर चढून एका शेतकऱ्याने शोले स्टाईल आंदोलन (Agitation) केले. कुबेर चिमाजी घाडगे, देगाव (ता. पंढरपूर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. उतारा दुरुस्त केल्याशिवाय खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेत त्याने, सोबत विषाची बाटली आहे. उतारा दुरुस्त न केल्यास ती पिऊन वरून उडी मारतो, असा इशाराही दिला.

शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन ! विष प्राशन करण्याची धमकी
सोलापुरात नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

पंढरपूर तालुक्‍यातील देगाव इथल्या गट नंबर 341/1, 341/2 अ, 341/2 ब या सात-बारा उताऱ्यावरील सर्कल, तलाठी, कोतवाल यांनी बेकायदेशीर नोंदी चुकीच्या पद्धतीने घेतल्याने सात-बारा उतारा दुरुस्त करून मिळावा, यासाठी कुबेर चिमाजी घाडगे हे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून बसले. दोन वाजेपर्यंत नोंदी न केल्यास बाटलीमधील विष पिऊन उडी मारेन, असा इशारा त्यांनी दिला होता.

शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन ! विष प्राशन करण्याची धमकी
पोलिस भरतीचे ठरले वेळापत्रक ! 'या' दिवशी लेखी परीक्षा

सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वापरात नसलेला उंच टॉवर आहे. यापूर्वीही टॉवरवर चढून अनेकजण आंदोलने करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या टॉवरवर कोणीही जाऊ नये म्हणून चारही बाजूने संरक्षक जाळी बसवली आहे. तरीही या जाळीवरून उडी मारून हा शेतकरी सकाळीच टॉवरवर चढून बसला. या वेळी तहसीलदार अंजली मरोड यांनी इमारतीवर चढून टॉवरच्या छतावरील त्या शेतकऱ्याला खाली उतरण्याची विनंती केली, मात्र सातबारा उताऱ्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, दोन वाजेपर्यंत आपण प्रशासनाला मुदत देतो, उतारा दुरुस्त केल्याशिवाय खाली उतरणार नाही, असा पवित्रा त्याने घेतला. सोबत विषाची बाटली आहे. उतारा दुरुस्त न केल्यास ती पिऊन वरून उडी मारतो, असा इशारा तो वरूनच देत होता. अखेर अग्निशामक दलास पाचारण करून त्या शेतकऱ्याला खाली उतरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.