Child_marriage
Child_marriageGallery

बार्शी तालुक्‍यात बालविवाह! अल्पवयीन मुलीनेच दिली चाइल्डलाइनला तक्रार

बार्शी तालुक्‍यात बालविवाह! अल्पवयीन मुलीनेच दिली चाइल्डलाइनला तक्रार
Published on
Summary

अकरावीमध्ये शिक्षण सुरू असतानाच अल्पवयीन मुलीला बळजबरीने बोहल्यावर बसवले आणि विवाह केल्याची घटना घडली.

बार्शी (सोलापूर) : शिक्षणाची मनामध्ये प्रचंड ओढ असताना कोरोनाच्या (Covid-19) संसर्गामुळे शहरातील महाविद्यालये बंद झाली. राज्यात लॉकडाउन (Lockdown) झाला अन्‌ शहरातून बार्शी तालुक्‍यात (Barshi Taluka) कुटुंबासह आलो. अकरावीमध्ये शिक्षण सुरू असताना बळजबरीने बोहल्यावर बसवले आणि विवाह (Chid Marriage) केला, अशी फिर्याद अल्पवयीन मुलीने शासनाच्या चाइल्ड लाइनमध्ये (Childline) देताच बार्शी तालुका पोलिस ठाण्यात (Barshi Police) गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

Child_marriage
एका भाषणाने मिळाली आयुष्याला कलाटणी! आज रमेश चोपडे आहेत...

याबाबत अल्पवयीन मुलीने सांगितले, की लॉकडाउन सुरू होताच गावाकडे आलो. शिक्षण बंद करून विवाहाची चर्चा सुरू झाली अन्‌ वडिलांच्या मामाने स्थळ सुचविले. आई- वडिलांनी होकार दिला. पाहण्याचा कार्यक्रम झाला; पण अल्पवयीन मुलीने मुलगा पसंत नाही असे सांगितले. मी अजून अल्पवयीन आहे, मला शिक्षण घ्यायचे आहे, विवाह करण्याची मला इच्छा नाही, असे सांगूनही आई- वडिलांनी मुलाचे घरदार जाऊन पाहिले व मुलाकडील मंडळींना होकार दिला आणि मला तुला विवाह करावाच लागेल, असे सांगितले.

कोरोना काळातच विवाह उरकण्यात आला. लॉकडाउनमुळे विवाहास कमी नातेवाईक होते. सासू- सासरे घरामध्ये कोंडून ठेवून शेतामध्ये कामाला जात होते तर घरातील कामांवरून शिवीगाळ करीत होते. ही घटना आई- वडिलांना सांगितली. त्यांनी मला पुन्हा स्वतःसोबत घेऊन गेले. आई-वडिलांनी परत सासरी नांदायला जा म्हणून तगादा सुरू, केला पण मला शिक्षण घ्यायचे आहे, मी जाणार नाही, असे त्यांना सांगितले आणि शासनाच्या चाइल्डलाइनमध्ये तक्रार दिली.

Child_marriage
निर्णय ठरला! 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार पहिली ते चौथीच्या शाळा

शासनाने घडलेल्या घटनेची गंभीरपणे दखल घेत आई, वडील, पती, सासू, सासरे, विवाह लावलेला ब्राह्मण, वडिलांचे मामा या सर्वांविरोधात बार्शी तालुका पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार रियाज शेख हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()