प्रशासनाच्या पाठबळानेच पंढरपुरात पेड कोविड सेंटरचा अजब प्रयोग ! पालकमंत्र्यांनीच केले उद्‌घाटन

पंढरपुरात पेड कोविड सेंटरचा अजब प्रयोग
प्रशासनाच्या पाठबळानेच पंढरपुरात पेड कोविड सेंटरचा अजब प्रयोग ! पालकमंत्र्यांनीच केले उद्‌घाटन
Updated on

पंढरपूर (सोलापूर) : विधानसभा पोटनिवडणुकीनंतर पंढरपूर (pandharpur) शहर व परिसरात कोरोनाचा मोठा फैलाव झाला आहे. परिसरातील सर्व हॉस्पिटल (Hospital)आणि कोविड केअर सेंटर (covid center) रूग्णांनी फुल्ल झाली आहेत. त्यातच आता कोरोनाग्रस्त नागरिकांना रोज 700 रुपये मोजून कोरोना केअर सेंटरमध्ये जावे लागणार आहे. पेड कोविड केअर सेंटरचा (paid covid center) हा अजब प्रयोग जिल्हा प्रशासनाच्या आशीर्वादानेच पंढरपुरात सुरू झाला आहे. येथील पेड कोरोना केअर सेंटरच्या संकल्पनेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. (A paid covid center has been started in pandharpur)

येथील विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीने वेदांत आणि व्हिडिओकॉन हे 300 खोल्यांचे दोन भक्त निवास कोरोना रूग्णांठी मोफत उपलब्ध करून दिले असले तरी याच भक्त निवासात खासगी हॉस्पिटलवाल्यांनी सुरू केलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये मात्र रूग्णांना दर दिवसाला 700 रूपये मोजावे लागणार आहेत.

प्रशासनाच्या पाठबळानेच पंढरपुरात पेड कोविड सेंटरचा अजब प्रयोग ! पालकमंत्र्यांनीच केले उद्‌घाटन
लसीसाठी सोलापूर वेटिंगवरच ! लसीअभावी 339 केंद्रे बंद

या पेड सेंटरचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता.7) पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात केले. नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेलेले कल्याणराव काळे यांच्या मालकीच्या जनकल्याण हॉस्पिटल आणि येथील उद्योगपती अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल कोविड सेंटरला हे भक्त निवास जिल्हा प्रशासनाने मोफत उपलब्ध करून दिले आहेत.

दरम्यान या पेड कोविड सेंटरला सर्वच स्तरातून विरोध होऊ लागला आहे. लॉकडाउनमुळे आधीच सर्व सामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात कोरोना संकटामुळे लोक हवालदिल झाले आहेत. आशा संकट काळात राजकीय नेत्यांनी व जिल्हा प्रशासनाने गोरगरीब व सर्व सामान्य लोकांसाठी येथील कोविड सेंटरमध्ये मोफत उपचार देणे आवश्‍यक असतानाच विलगीकरणासाठी देखील लोकांकडून पैसे घेतले जात असल्याने जिल्हा प्रशासनाच्या या अजब पेड संकल्पनेबद्दल ही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मान्यतेनुसार पेड कोविड सेंटर सुरू केले आहे. ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे असतील अशा रूग्णांची येथे सोय केली आहे. सेवाभावी वृत्तीने जर कोणी मोफत सेवा देण्यासाठी पुढे येणार असतील तर त्यांनाही कोविड सेंटर सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल.

- सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.