मोहोळ शहरातून पोलिसांचा रूट मार्च घेण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.
मोहोळ (सोलापूर): आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मोहोळ पोलिस ठाणे हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शना खाली मोहोळ शहरातून पोलिसांचा रूट मार्च घेण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.
या वेळी पोलिस निरीक्षक अशोक सायकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, संतोष माने व तीस पोलिस कर्मचारी यांनी रूट मार्च मध्ये सहभाग नोंदविला. आगामी काळातील गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गावकामगार पोलिस पाटील, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी कांही सुचना दिल्या.
त्यात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळाने स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील, कोरोना च्या अनुषंगाने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, एक गाव एक गणपती ही संकल्पना जास्तीत जास्त राबविण्यात यावी, गणेश मूर्ती सार्वजनिक मंडळासाठी 4 व घरगुती साठी 2 फुटाची असावी, गणेश मूर्ती शाडूची व पर्यावरण पूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे, सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्या विषयीचे उपक्रम राबवावेत, स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, ध्वनी प्रदूषणा संदर्भातील नियम व तरतुदीचे काटेकोर पालन करावे.
श्री चे आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये, गणेशोत्सव मंडळा तर्फे आक्षेपार्ह देखावे, शुभेच्छा फलक लावण्यात येऊ नयेत, मंडप कमानी उभारताना वाहतुकीस अडथळा, तसेच अपघात होणार नाहीत या बाबत दक्षता घेण्यात यावी याचा समावेश आहे. जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे व त्यावर होणारे वाद याबाबत वेळीच कारवाई करण्यात येणार आहे, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 मधील तरतुदी व ध्वनी पातळीच्या मर्यादे बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्या वर योग्य ती कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगत, पुढील आठवड्यापासून ज्यांच्यावर दोन व दोन पेक्षा जादा गुन्हे दाखल आहेत अशांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार करून वरिष्ठा कडे मंजुरी साठी पाठविण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.