शेळगावच्या विद्यार्थ्याचा जुगाड! बनवली चक्क बॅटरीवर चालणारी सायकल
शेळगावच्या विद्यार्थ्याचा जुगाड! बनवली चक्क बॅटरीवर चालणारी सायकलCanva

शेळगावच्या विद्यार्थ्याचा जुगाड! बनवली चक्क बॅटरीवर चालणारी सायकल

शेळगावच्या विद्यार्थ्याचा जुगाड! बनवली चक्क बॅटरीवर चालणारी सायकल
Published on
Summary

बार्शी तालुक्‍यातील शेळगाव (आर) येथील श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणाऱ्या संकेत गायकवाड या दहावी पास विद्यार्थ्याने मोबाईल तंत्रज्ञानाचा विधायक वापर करून जिद्दीने बॅटरीवर चालणाऱ्या सायकलचा शोध लावला आहे.

सासुरे (सोलापूर) : बार्शी (Barshi) तालुक्‍यातील शेळगाव (आर) येथील श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणाऱ्या संकेत गायकवाड (Sanket Gaikwad) या दहावी पास विद्यार्थ्याने मोबाईल तंत्रज्ञानाचा (Mobile technology) विधायक वापर करून जिद्दीने बॅटरीवर चालणाऱ्या सायकलचा (E-Cycle) शोध लावला आहे. त्याबद्दल त्याचे सर्वत्र कुतूहल व्यक्त होत असून, यातून सर्वसामान्यांसाठी नवा पर्याय निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

शेळगावच्या विद्यार्थ्याचा जुगाड! बनवली चक्क बॅटरीवर चालणारी सायकल
मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा! मिळणार 'या' दिवसापासून विंडोज 11 अपडेट

शेळगाव (आर) येथील श्रीराम प्रायमरी सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत शिकणाऱ्या संकेतने अडगळीत पडलेल्या सायकलीला वापरात आणत जुन्या पंपाच्या दोन बॅटऱ्या बसवून मोटार आणि कंट्रोलरच्या सहाय्याने 25 वॉट चार्जिंगच्या बॅटरीवर सायकल यशस्वीरीत्या चालवली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे संकेतने तयार केलेली इलेक्‍ट्रिक सायकल काही सामान्य सायकल नसून, ती एका मोटारसायकलला देखील स्वस्त आणि मस्त पर्याय ठरू शकते अशी आहे. बॅटरीवर चालणारी संकेतची इलेक्‍ट्रिक सायकल दोन तासांत दोन युनिटमध्ये पूर्णपणे चार्ज झाल्यावर जवळपास 25 किलोमीटरपर्यंत चालू शकते. त्यामुळे केवळ 40 पैसे प्रति किलोमीटर खर्च येणार आहे.

खरंतर बॅटरीवर चालणारी सायकल तयार करण्यामागे पेट्रोलच्या वाढत्या किमती, महागड्या इलेक्‍ट्रिक बाईक्‍स हेच मुख्य कारण आहे. यासोबतच अधून-मधून शारीरिक व्यायामही करता यावा याची जाणीव ठेवून संकेतने इलेक्‍ट्रिक सायकल तयार करण्याचं काम सुरू केलं. संकेतने जुनी विविध उपकरणे वापरून इलेक्‍ट्रिक सायकल तयार केली आहे.

शेळगावच्या विद्यार्थ्याचा जुगाड! बनवली चक्क बॅटरीवर चालणारी सायकल
राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेचा 'या' दिवशी निकाल! 2019 चा निकाल लांबला

नेमकी कशी आहे बॅटरीवर चालणारी सायकल...

संकेतच्या या सायकलमध्ये सर्वसामान्य सायकलप्रमाणे दोन्ही हॅंडलला ब्रेक देण्यात आले आहेत. पण यात मोटारसायकलसारखाच ऍक्‍सिलेटरचा वापर करण्यात आला आहे. पुढे लाईट बसवण्यात आली असून हॉर्नचीही सोय करण्यात आली आहे. सायकलच्या मधल्या नळीच्या खाली दोन बॅटऱ्या बसविण्यात आल्या आहेत. एकंदर या इलेक्‍ट्रिक सायकलवर बसल्यानंतर मोटारसायकल चालवताना जी काळजी बाळगावी लागते, त्याच पद्धतीनं इलेक्‍ट्रिक सायकल चालवावी लागणार आहे.

शेळगावसारख्या छोट्याशा खेड्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीतही अथक प्रयत्नातून नवीन प्रयोग आकारास येत असल्यामुळे संकेतला आर्थिक पाठबळ देण्यासाठी शेळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पाच हजार रुपयांचा धनादेश त्याला बक्षीस म्हणून सोपवण्यात आला. या सायकल निर्मितीसाठी संकेतला सुरवातीपासून आतापर्यंत साधारणपणे वीस हजार रुपये खर्च आला असून, भविष्यात हा खर्च कमी ही होऊ शकतो. त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये बॅटरीवर चालणारी सायकल सर्वसामान्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

सध्या संकेत आपल्या खास सायकलच्या चार्जिंग यंत्रणेत आणखी सुधार करण्यासाठीचे प्रयत्न करत आहे; जेणेकरून सायकल चालवत असतानाच निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून बॅटरी चार्जिंग करता येईल का? किंवा सौरपॅनेल बसवून बॅटरीची क्षमता वाढवता येईल का? यावर भर देणार असल्याचे संकेत गायकवाडने सांगितले.

संकेतने दिवस-रात्र मेहनत करून बॅटरीवर चालणारी सायकल बनवली. त्याच्या या यशाचा सार्थ अभिमान वाटतो.

- परमेश्वर गायकवाड, संकेतचे वडील

लॉकडाउनमध्ये ऑनलाइन शिक्षण घेत घेत संकेतने लावलेला हा शोध सर्व विद्यार्थ्यांसाठी आदर्श असून, आमच्या शाळेचा विद्यार्थी असल्याचा आम्हाला अभिमान आहे.

प्रा. नीलेश गायकवाड, श्रीराम प्रायमरी सेमी इंग्लिश मीडियम स्कूल, शेळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()