छंदातून फुलवली गच्चीवर बाग! उत्पन्नही सुरू; मिळतोय ऑक्‍सिजनही

छंदातून फुलवली गच्चीवर बाग! उत्पन्नही सुरू; मिळतोय ऑक्‍सिजनही
छंदातून फुलवली गच्चीवर बाग! उत्पन्नही सुरू; मिळतोय ऑक्‍सिजनही
छंदातून फुलवली गच्चीवर बाग! उत्पन्नही सुरू; मिळतोय ऑक्‍सिजनहीCanva
Updated on

शंभर नाही, दोनशे नाही तर चक्क दोन हजार फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती यांसह कमळाच्या 25 प्रकारच्या झाडांचे संवर्धन केले आहे.

बार्शी (सोलापूर) : कोरोना संसर्गाच्या (Covid-19) दुसऱ्या टप्प्यात ऑक्‍सिजनला (Oxygen) खूप महत्त्व प्राप्त झाले होते. ऑक्‍सिजनअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले. मोकळ्या हवेत फिरायला जाणे, उद्यानामध्ये जाणे यासह योगा, व्यायाम करून आपले आरोग्य चांगले ठेवणे यासाठी प्रत्येकजण काळजी घेताना दिसत आहे. त्याकडे ओढाही वाढला आहे. पण बार्शीच्या महिलेने स्वछंदातून गच्चीवर बाग फुलवून ऑक्‍सिजन तर मिळवलाच पण त्या बागेतून उत्पन्नही सुरू झाले असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले. (A Woman of Barshi Flowering garden on the terrace and Income also continuous)

छंदातून फुलवली गच्चीवर बाग! उत्पन्नही सुरू; मिळतोय ऑक्‍सिजनही
दहावी-बारावी निकालाची ठरली तारीख !

शंभर नाही, दोनशे नाही तर चक्क दोन हजार फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती यांसह कमळाच्या 25 प्रकारच्या झाडांचे संवर्धन केले आहे. घरामध्ये प्रवेश करताच टब, ड्रम, कुंड्या अगदी गच्चीवर जाताना प्रत्येक पायरीवर ठेवल्या आहेत. मनगिरे मळा येथील सोलापूर जनता सहकारी बॅंकेचे माढा शाखेचे शाखाधिकारी अतुल केसकर यांच्या पत्नी वृंदा केसकर यांनी ही किमया केली आहे. मागील दहा वर्षांपासून त्यांनी स्वछंदातून गच्चीवर बाग केली अन्‌ आता त्यातून महिनाकाठी तीन हजारपेक्षा जास्त उत्पन्न त्यांना प्राप्त होत आहे. चाफा, कृष्ण कमळ, गोकर्ण, गुलाब, सायली, जुई, जाई, भुईचाफा, स्नेक प्लांट, फेलेकोनिया, तुळशीचे सहा प्रकार, वड, पिंपळ, गुलमोहोर, वाळा, ओवा, पुदिना, कोरफड, पानफुटी, लिंबू, कडीपाला, गुंजपाला, गवतीचहा यासह वानविसा, दाऊबेन, क्‍लोरोरायडो, मेक्‍सिकान, पर्पलजॉय, ब्लॅकप्रिन्सेस आदी प्रकार आहेत. या छंदाबाबत वृंदा केसकर म्हणाल्या, सध्या मणीवर्क, इटलॉन वर्क, इमिटेशन, सुतळी वर्क ज्वेलरी यातून आजही चांगले उत्पन्न महिलांना मिळू शकते. होम सायन्स हा विषय शिक्षणात सुरू करणे जरुरीचे आहे. सोलापूरला असताना सेवासदनमध्ये असे सर्व क्‍लास घेतले जात होते. रांगोळ्या, चौरंगपाट, आकाशदिवे तसेच थर्माकोलचे वेगवेगळे मखर, मंदिरे, आरास तयार करून उत्पन्न मिळवत आहे. थोडे महाग असते पण कोरोनामुळे किमती वाढल्या आहेत. कच्चा माल पुण्यातून खरेदी करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

छंदातून फुलवली गच्चीवर बाग! उत्पन्नही सुरू; मिळतोय ऑक्‍सिजनही
म्हारी छोरियॉं छोरों से कम हैं के..!

कमळाच्या सगळ्या टबमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. त्यामुळे डास होत नाहीत. मावा पडल्यावर तंबाखूची पुडी भिजवून फवारणी करते. बागेची निगा राखण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली असून महिन्याला खते, खुरपणे अशी मशागत करून काळजी घेतली जात आहे. सध्या कंद विक्रीतून उत्पन्न मिळत आहे.

- वृंदा केसकर, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.