'माझे पैसे द्या, नाहीतर विष खायला पैसे द्या' - शेतकऱ्याची मागणी

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कालव्याला दोन्ही बाजूने प्लास्टर करावे, कालव्याच्या आतील भागाचे सपाटीकरण करावे, बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे ही योजना रखडली आहे.
aashti upasa irrigation scheme canal
aashti upasa irrigation scheme canalsakal
Updated on
Summary

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कालव्याला दोन्ही बाजूने प्लास्टर करावे, कालव्याच्या आतील भागाचे सपाटीकरण करावे, बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे ही योजना रखडली आहे.

मोहोळ - आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कालव्याला दोन्ही बाजूने प्लास्टर करावे, कालव्याच्या आतील भागाचे सपाटीकरण करावे, बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे ही योजना रखडली आहे. त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे यासह अन्य मागण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी या योजनेच्या कालव्यातच न्याय मिळेपर्यंत मंगळवार ता 11 पासून धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तशा आशियाचे लेखी निवेदन त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, सन 1995 मध्ये युती शासनाच्या काळात ही योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचे बरेचसे काम झालेही आहे. मात्र प्रत्येक वेळी राज्यकर्त्यांनी या योजनेचे भांडवल करून तात्पुरत्या स्वरूपात निधी उपलब्ध करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली. विशेष म्हणजे गेली 27 वर्षे झाली ही योजना अद्यापही रखडलेलीच आहे. या योजनेच्या कालव्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांना आज पावेतो या सिंचन योजनेचे पाणीही मिळाले नाही. कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला तसेच फळबागांचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत ते त्वरित द्यावेत अशा मागण्या देशमुख यांनी केल्या आहेत.

या योजनेच्या जवळच असलेल्या हिवरे, वडाची वाडी, चिखली या गावांचा या योजनेत समावेश करावा, आष्टी उपसा सिंचन योजनेतच्या टप्पा क्रमांक दोनचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. ते काम लवकर करून खवणी, पोखरापूर, सारोळे या गावांचा दुष्काळ संपवावा, उजनी कालव्याचे पाणी सुटल्यावर ते आष्टी तलावात प्राधान्याने सोडावे, पापरी, खंडाळी येथील लघु वितरीकेची कामे अपुरी आहेत ती त्वरित पूर्ण करावीत या मागण्यासाठी मंगळवार पासून पाटकुल येथील या कालव्यातच धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

शेतक-याने शासनाला विष खाण्यासाठी पैसे मागितले

कोन्हेरी, ता. मोहोळ येथील शेतकरी ओम अण्णा शेटे याची जमीन या कालव्यात गेली आहे. तिचा मोबदला तर मिळालाच नाही. परंतु त्या जमिनीत असलेल्या फळबागेचा पंचनामा झाला आहे. फळबागेची 75 टक्के रक्कम द्यावी अशी त्यांची मागणी आहे. मात्र 2017 पासून याही मागणीला केराची टोपली दाखवली जात आहे. मला पैसे तरी द्या किंवा विष खायला तरी पैसे द्या अशी त्यांनी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.