‘बाबरी’ शिवसैनिकांनी पाडली हे सांगण्याची गरज नव्हती : अबू आझमी

आबू आझमी यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली
Abu Azmi
Abu Azmi Sakal
Updated on

सोलापूर - ‘‘देशाच्या एकात्मतेला नजर लागली आहे. २०१४ पासून देश आठ पावले मागे गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश विकत आहेत. मी देश विकू देणार नाही,’’ असे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार आबू आझमी म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बाबरी शिवसैनिकांना पाडली, असे सांगून जुन्या जखमेवरील खपल्या काढण्याची आवश्यकता नव्हती, असे मत त्यांनी व्यक्त केले. उस्मानाबादला जाताना आबू आझमी यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. आझमी म्हणाले, की माझ्या पाठिंब्यामुळे ना सरकार वाचणार होते ना पडणार होते. मात्र आम्ही महाविकास आघाडीला धर्मनिरपेक्ष म्हणून पाठिंबा दिला होता. या आघाडीने मुस्लिम समाजासाठी काय केले. मौलाना आझाद महामंडळाची समिती किंवा हज कमिटीची स्थापनाही केली नाही.

नामांतराने रोजगार मिळणार का?

उस्मानाबाद ः ‘‘शहरांची नावे बदलून काय साध्य होणार? कोणाला रोजगार मिळणार आहे का? काय प्रगती होणार आहे, याची उत्तरे नामांतर करणाऱ्यांनी द्यावीत. नावे बदलण्यासाठी होणाऱ्या खर्चातून विकासाचे काही प्रकल्प मार्गी लागू शकतात, असे मत अबू आझमी यांनी आज येथे व्यक्त केले.

ते म्हणाले, की विकासाच्या मुद्याला बगल देऊन धार्मिक विरोधाला खतपाणी घालण्याचे काम केंद्रातील सरकारने सुरु केले आहे’. काँग्रेसची शक्ती आता कमी होत आहे. काँग्रेसने त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रीय पक्षाची शक्ती वाढली तरच परिवर्तन शक्य आहे, असेही आझमी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.