सोलापूर - महाविद्यालयात झालेल्या ओळखीतून कर्नाटकच्या एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केले. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण तिच्या होणाऱ्या नवऱ्यास पाठवून तिचे लग्न मोडले. याप्रकरणी अंकित देसिंग राठोड (वय २५, रा. निंबाळ, ता. इंडी, जि. विजयपूर) याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.