Accident: सोलापुरजवळ भीषण अपघात, मालट्रकच्या धडकेत सख्ख्या बहिणी जागीच ठार

Solapur: मुळेगाव रोडवरील चंदनकाटा परिसरातील मुळेगाव क्रॉस रोडवर गुरुवारी हा अपघात झाला.
Accident Terrible accident near Solapur 2 sisters  killed on the spot in a collision with a goods truck
Accident Terrible accident near Solapur 2 sisters killed on the spot in a collision with a goods trucksakal
Updated on

Latest Solapur News: हैदराबाद रोडवरून मुळेगाव रोडच्या दिशेने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघींना भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रकने मागून जोरात धडक दिली. या अपघातात ज्योती यशवंत बडगंची (वय ५७, रा. दाजी पेठ) व जयंती कमलाकर उदगिरी (वय ४३, रा. राजस्वनगर) या दोघी सख्ख्या बहिणी जागीच ठार झाल्या. जोडभावी पेठ पोलिसांनी मालट्रक जप्त केला आहे.

मुळेगाव रोडवरील चंदनकाटा परिसरातील मुळेगाव क्रॉस रोडवर गुरुवारी हा अपघात झाला. कामानिमित्त दोघी बहिणी दुचाकीवरून मुळेगावकडे निघाल्या होत्या. पण, त्यांच्यावर वाटेतच काळाने घाला घातला. हैदराबादच्या दिशेने भरधाव वेगाने

Accident Terrible accident near Solapur 2 sisters  killed on the spot in a collision with a goods truck
Accident: अजिंठा-बुलढाणा महामार्गावर भीषण अपघात, एक जण जागीच ठार

निघालेल्या मालट्रकचा (एमएच ०४, झेड २६३९) मागील बाजूचा कट दुचाकीला लागला. त्यात दोन्ही बहिणी दुचाकीवरून रस्त्यावर पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला, तोंडाला, सर्वांगाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर काहीवेळाने मदतनीस उमेश कांबळे यांनी ज्योती बडगंची यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.

मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर जयंती उदगिरी यांना पती कमलाकर यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शनिवारी पोलिसांत गुन्हा दाखल होईल. मालट्रक चालक सोलापूर शहरातीलच असून, त्याला अजून पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही.

Accident Terrible accident near Solapur 2 sisters  killed on the spot in a collision with a goods truck
वडगाव निंबाळकरमधील रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे अपघाताचा धोका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.