Sangola Accident : भरधाव ट्रकने धडक दिल्याने सहा महिला शेतमजुरांचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

Sangola Accident : सोलापूर जिल्ह्यातील महूद ते दिघंची रस्त्यावर सातपुतेवस्ती पाटीजवळ गावाकडे जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला वाहनाची वाट पाहात उभ्या असलेल्या महिला मजुरांना भरधाव ट्रकने चिरडले.
Sangola Accident
Sangola Accident Esakal
Updated on

महूद : सोलापूर जिल्ह्यातील महूद ते दिघंची रस्त्यावर सातपुतेवस्ती पाटीजवळ गावाकडे जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला वाहनाची वाट पाहात उभ्या असलेल्या महिला मजुरांना भरधाव ट्रकने चिरडले. या दुर्घटनेत सहा महिला मजूर ठार झाल्या असून, एक गंभीर जखमी आहे. ही घटना आज घडली. या अपघातातील मृत महिला मजूर कटफळ (ता. सांगोला) येथील आहेत.

नेहमीप्रमाणे १४ हून अधिक महिला चिकमहूद हद्दीत कामाला आल्या होत्या. काम संपल्यानंतर त्या कटफळकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहात रस्त्याच्या कडेला बसल्या होत्या. पंढरपूरहून वीस चाकी मालवाहतूक ट्रक (एमएच ५०- एन ४७५७) वळत असताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक महिला मजुरांच्या दिशेने भरधाव गेला. यात इंदूबाई बाबा इरकर (वय ५०), भीमाबाई लक्ष्मण जाधव (४५), कमल यल्लाप्पा बंडगर (४०), सुलोचना रामा भोसले (४५), अश्विनी शंकर सोनार (१३), मनीषा आदिनाथ पंडित (५०) या ठार झाल्या.

Sangola Accident
Weather Update: मुंबईसह पुण्यात संततधार पाऊस सुरू; 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामान विभागाचा अंदाज

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर-कराड रस्त्यावर सांगोला तालुक्यातील चिकमहूद गावाजवळ काल (मंगळवारी) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सांगोला तालुक्यातील कटफळ येथील राहणाऱ्या आठ महिला शेतमजूर ऊस लावण्यासाठी चिकमहूद गावाखालील बंडगरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सकाळी नऊ वाजता गेल्या होत्या.

Sangola Accident
सोलापूर जिल्ह्यातील सर्वांनाच आता 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! 1300 आजारांचा योजनेत समावेश, पण ‘हे’ कार्ड आजच काढा, कागदपत्रे कोणती लागणार, नक्की वाचा

ऊस लागवडीनंतर साडेचारच्या सुमारास घरी परत जाण्यासाठी पंढरपूर-कराड रस्त्यावर चिकमहूदजवळ बंडगरवाडी येथे रस्त्याच्या कडेला या आठ महिला शेतमजूर एसटीची वाट पाहात थांबल्या होत्या. परंतु पंढरपूरहुन कराडला जाणारी वीस चाकी मालमोटारीने (एमएच ५० एन ४७५७) वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला मजुरांना चिरडलं. अपघात घडताच घटनास्थळी गोंधळ उडाला. स्थानिक तरूणांनी मदतकार्य केले. चालकाला ताब्यात घेऊन पोलिसात देण्यात आले.

Sangola Accident
शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! शेतात बसून करता येईल पीकपेऱ्यांची 7/12 उताऱ्यावर नोंद; एकाच मोबाइलवर करता येईल 20 शेतकऱ्यांना नोंद; फायदे काय? वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.