शिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई! मुख्याध्यापकासह १६ शिक्षकांची एक दिवसाची पगार कापली

पेनूर येथील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमधील लेटकमर शिक्षक व वार्षिक नियोजन नाही, पाठ्यपुस्तके अस्ताव्यस्त पडलेली, परिसर अस्वच्छता, अशा कारणांमुळे एका मुख्याध्यापकासह १५ शिक्षकांची एक दिवसांची पगार कपात करण्याची कारवाई शिक्षणाधिकाऱ्यांनी केली.
 शिक्षक
शिक्षकEsakal
Updated on

सोलापूर : कोरोना काळात दोन वर्षे पालकांसोबत मुले घरीच होती. पालकांच्या सहवासात लाडावलेली चिमुकली दोन वर्षांनी पहिल्यांदाच शाळेत गेली आहेत. त्या ठिकाणी शिक्षकांच्या शिकवण्याकडे त्यांचे मन लागत नाही. त्यांना घरी जाण्याचीच ओढ असते, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना आता पुस्तकी अध्यापनाऐवजी मुलांना मनोरंजनातून शिक्षण देण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, पेनूर येथील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमधील लेटकमर शिक्षक व वार्षिक नियोजन नाही, पाठ्यपुस्तके अस्ताव्यस्त पडलेली, परिसर अस्वच्छता, अशा कारणांमुळे एका मुख्याध्यापकासह १५ शिक्षकांची एक दिवसांची पगार कपात करण्याची कारवाई शिक्षणाधिकाऱ्यांनी केली.

 शिक्षक
ऑगस्टमध्ये सीईटी! तुरळक विषयांची परीक्षा देऊन पूर्ण करता येईल ‘अभियांत्रिकी’ची पात्रता

जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या दोन हजार ७९७ तर शहरात महापालिकेच्या ५८ शाळा आहेत. पहिली ते तिसरीपर्यंतच्या मुलांची संख्या ४० हजारांवर आहे. काही चिमुकली पहिलीत गेली आहेत. त्या चिमुकल्यांचे मन शहरी किंवा तालुक्याच्या शाळेत रमणार नाही म्हणून जवळच्याच झेडपी शाळांमध्ये किंवा महापालिकेच्या शाळांमध्ये मुलांचा प्रवेश घेतला आहे. त्यामुळे मराठी शाळांमधील मुलांचा पट यंदा वाढला आहे. पण, या निमित्ताने शिक्षकांना गुणवत्ता सिद्ध करून त्या मुलांना आपल्याच शाळेत ठेवावे, नवीन पालकांनीही त्यांच्या मुलांचा जिल्हा परिषद व महापालिकांच्या शाळेत प्रवेश घ्यावा, यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. आता पहिली ते तिसरीतील मुले शाळेत सकाळी १० ते साडेपाच किंवा दुपारी १२ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत बसत नसल्याचीही स्थिती आहे. एकजण रडतोय तर दुसरा घरी जाण्याचा आग्रह धरतोय, अशी स्थिती आहे. त्या मुलांना शाळेच्या वातावरणात रमवण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागत आहे.

 शिक्षक
तरूणांसाठी खुशखबर! महाविकास आघाडी करणार एक लाख पदांची मेगाभरती

पालकच करू लागले मुलांचे मूल्यमापन
‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ हा प्रकार पूर्णत: बंद झाला आहे. शिक्षकांनाही पटसंख्या टिकवून अतिरिक्त होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागत आहे. त्यामुळे पालकांची मर्जी सांभाळून विद्यार्थ्यांना अध्यापन करावे लागत आहे. पालक आता मुलांचे मूल्यमापन करू लागले आहेत. दोन-तीन वर्षांत मुलांची गुणवत्ता वाढली नाही, तर पालक आपल्या मुलांची शाळाच बदलत आहेत. त्यामुळे गुणवत्तापूर्ण अध्यापन हे शिक्षकांपुढील आव्हान आहे. मुलांना पाढे म्हणायला लावून किंवा उजळणी काढायला लावून निवांत बसणाऱ्या शिक्षकांना आता कामच करावे लागणार आहे.

 शिक्षक
३ विषयांत नापास विद्यार्थ्यांनाही अकरावीला प्रवेश! सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेला सुरवात

गुणवत्तावाढीसाठी ठोस प्रयत्नांची गरज
जिल्हा परिषदांच्या शाळांची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच अशीच असणार आहे. कोरोनातून बाहेर पडल्यानंतर मुलांची गुणवत्ता वाढविण्याचे आव्हान समोर असतानाही काही शिक्षक नियम पाळत नाहीत. कोरोना काळात पालकांच्या सहवासात राहिलेल्या मुलांना शाळेच्या वातावरणात सामावून घेऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती १०० टक्के होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत.
- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

 शिक्षक
तरूणांसाठी खुशखबर! महाविकास आघाडी करणार एक लाख पदांची मेगाभरती

मुख्याध्यापकासह १६ शिक्षकांचे वेतन कापले
पंचायत राज समितीचा दौरा संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी (शनिवारी) प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी मोहोळ तालुक्यातील चार शाळांना भेटी दिल्या. पेनूर येथील जिल्हा परिषदांच्या दोन शाळेतील एक मुख्याध्यापक आणि १५ शिक्षक शाळेत वेळेवर आलेले नव्हते. पाठ्यपुस्तके अस्ताव्यस्त पडली होती, वार्षिक नियोजन व्यवस्थित नाही, शाळेचा परिसर, वर्गखोल्यांमध्ये अस्वच्छता, शालेय पोषण आहाराचे नियोजन नसल्याचे दिसून आले. त्यामुळे एका शाळेच्या मुख्याध्यापकासह दोन शाळांमधील १५ शिक्षकांची त्या दिवशीची गैरहजेरी लावून त्यांचा त्या दिवसाचा पगार कपात करण्याची कारवाई शिक्षणाधिकाऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.