पिंपळनेर - टीव्हीच्या छोट्या पडद्यावरील ‘देव माणूस’ या मालिकेतील शीर्षक भूमिकेतून घरोघरी प्रसिद्ध झालेला अभिनेता किरण गायकवाड सध्या नव्या चित्रपटाच्या तयारीत दंग झाला आहे. पिंपळनेर ते मायानगरी, डीजे ते मुख्य अभिनेता हा किरणचा अभिनय प्रवास नवोदितांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.
किरणला सध्या एका नव्या चित्रपटाचा ‘नाद’ लागला असून ‘नाद-द हार्ड लव्ह’ या आगामी मराठी चित्रपटात तो मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला भोर येथे सुरवात ही झाली आहे.
शकुंतला क्रिएशन प्रॉडक्शन व जिजाऊ क्रिएशन मेकर या निर्मिती संस्थांतर्गत ‘नाद’ ची निर्मिती करण्यात येत आहे. संजय पगारे व रूपेश पगारे हे दोनबंधू चित्रपटाचे निर्माते असून दिग्दर्शनाची धुरा ‘बलोच’ फेम प्रकाश जनार्धन पवार यांनी संभाळली आहे.
पिंपळनेरसारख्या खेड्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण व श्री गणेश विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या किरणने शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनातच आपल्या अभिनयाची चुणूक दाखवायला सुरवात केली होती. लहानपणीच वडिलांचे छत्र हारवल्याने भविष्याची चिंता होती.
हाती मिळेल ते काम करीत शिक्षणासह घर चालविताना खूप ओढाताण होत होती. मात्र आयुष्याची दिशा ठरत नव्हती. शेवटी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आई व बंधू विनायक यांनी कामासाठी पुण्यात स्थायिक होण्याचे ठरवले व तेथूनच लहान मोठी कामे करीत असताना अभिनयास संधी मिळाली.
प्रारंभी डीजे म्हणून काम करता करता लहान पडद्यावरील 'देवमाणूस' या मालिकेत खलनायकाची भूमिका मिळाली. अगदी सहजपणे साकारलेला खलनायकी अभिनयाने किरणच्या करिअरला कलाटणी मिळाली.
प्रतिकूल परिस्थितीतून गेलेल्या किरणला लहानपणापासून अभिनय क्षेत्राची आवड होती. पिंपळनेच्या श्री गणेश विद्यालयात शिक्षण घेत असताना तो सर्वांशी प्रेमाने व हसतमुख राहत असे अभ्यासातही हुशार असणारा किरण आज अभिनेता झाल्याचा आनंद होतो.
- सुदर्शन पेटकर, किरणचा वर्गमित्र
खलनायक किंवा नायक साकारायला मिळणे हे लेखक दिग्दर्शकावर अवलंबून असते कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात मला अभिनयातील दोन्ही टोकाच्या भूमिका रसिकांपुढे सादर करता आल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो.
- किरण गायकवाड, अभिनेता
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.