Adhik Maas 2023 :अधिक मास येता, आई अन्‌ जावयाचं कोडकौैतुक

उद्यापासून श्रावण अधिक मास; घरोघरी पुरुषोत्तम मासाची झाली तयारी
Adhik Maas 2023
Adhik Maas 2023 esakal
Updated on

Adhik Maas 2023 : श्रावण अधिक मास मंगळवार (ता.१८) पासून सुरू होत असून विविध धार्मिक परंपरासोबत मातृपूजन, जावयांचा सन्मान, दान, व्रताचे पर्व सुरु होत आहे. घरोघरी पुरुषोत्तम मासाची तयारी झाली आहे. या पवित्र महिन्याचे स्वागत करण्याला सगळेजण सज्ज झाले आहेत.

ायावर्षी अधिक श्रावण आला आहे. त्याला पुरुषोत्तम मास देखील म्हटले जाते. हा नियमित महिन्याच्या सोबत अधिकचा असल्याने त्याला अधिक मास म्हटले जाते.

मंगळवार (ता.१८) पासून अधिक महिना सुरु होईल व तो १६ ऑगस्टला संपेल. त्यानंतर १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ हा श्रावण मास आहे.

अधिक महिन्यांत दशमी, एकादशी, द्वादशी, पौर्णिमा ह्या विशेष तिथींना दान देण्याचं अधिक महत्त्व आहे. तसेच पंचपर्व म्हणजेच वैधृती योग, व्यतिपात योग, अमावस्या, पौर्णिमा, द्वादशी तिथी ही पंचपर्व आहेत या दिवशी दाने दिली जातात. अधिक मासांत गंगास्नानाचंही तितकंच महत्त्व आहे. अनेकजण संपूर्ण महिनाभर गंगास्नान करतात.

Adhik Maas 2023
Shravan Adhik Maas: अधिकमासात जावईबापूंना धोंडफळ! 18 जुलैपासून अधिकच्या महिन्याला सुरवात

दान देताना अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक, बर्फी तसेच सप्तधान्याची दाने ३३ नग याप्रमाणे दिली जातात. तांब्याच्या ताम्हणात पळसाच्या पानाची पत्रावळ ठेवून त्यावर गहू ठेवतात. त्यावर दान देण्याची वस्तू ठेवून हे दान दिले जातात. त्यावर रुमाल,उपरणं झाकून त्यावर दीप प्रज्वलित केला जातो. आईने केलेल्या कन्यादाना बद्दलची कृतज्ञता म्हणून अधिक मासांत मुली त्यांच्या आईची साडी, खण-नारळाने ओटी भरतात.

तसेच कृष्णाला रोज तुळस वाहणे, लोण्याचा प्रसाद वाहणे व बालगोपाळांना वाटणे, विष्णू सहस्रनाम पठन आदी उपक्रम देखील केले जातात.

Adhik Maas 2023
Adhik Shravan Maas : दर अडीच वर्षांनंतर का येतो अधिक मास, काय आहे त्याचं महत्व? जाणून घ्या..

हा तीन वर्षातून एकदा येतो. हा महिना व्रतवैकल्य, अखंड हरिनाम सप्ताह यासाठी विशेष मानला जातो. या निमित्ताने अनेक ठिकाणी महिनाभराच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.

अधिक मासातील उपक्रम

  • मुलींकडून आईचे पूजन व साडी, खणानारळाने ओटी भरणे

  • जावयांना बोलावून त्यांना सन्मानित करणे

  • गुरुजींना भोजनदान

  • देवालयात व गंगेला दान

  • गुरुजी व दांपत्य भोजन

  • ३३ संख्येत बत्तासे, अनारसे आदींचे दान

Adhik Maas 2023
Adhik Maas 2023 : अधिक श्रावण मास उद्यापासून, कोल्हापूरकरांची हॉटेल्ससह ढाब्यांवर तोबा गर्दी; मांसाहारावर येणार मर्यादा

नीज श्रावणात शिवपूजन

श्रावण अधिक मास असल्याने नीज श्रावण महिना हा त्यानंतर १७ ऑगस्टपासून सुरु होत आहे. त्यामुळे श्रावणाचे पारंपरिक श्रावण सोमवारचे शिवपूजन व उपवास हे १७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या नीज श्रावणात करावयाचे आहेत.

अधिक मासात विविध प्रकारची व्रते, अन्नदान व इतर दाने करण्याची परंपरा आहे. गुरजीना व दांपत्य भोजन देखील केले जाते. विष्णुयाग देखील केला जातो.

- वैभव कामतकर, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा पुरोहित संघ, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.