सन्मानपत्र, पंचवस्त्र, स्मृती चिन्ह व 51 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पंढरपूर (सोलापूर): संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात मला मिळालेला पुरस्कार हा मुक्ताबाई फडावरील वारकऱ्यांचा केलेला सन्मान असून हा पुरस्कार मुक्ताई चरणी अर्पण करतो, असे भावोत्कट प्रतिपादन संत मुक्ताबाई संस्थान कोथळी मुक्ताईनगर संस्थेचे अध्यक्ष अॅड. भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी केले. पंढरपूर येथे वारकरी संप्रदायातील अत्यंत प्रतिष्ठेचा 23 वा सद्गुरू सोपानकाका देहूकर संतप्रभृती पुरस्कार स्वीकारताना ते बोलत होते.
पंढरपूर येथे देहूकर वाड्यात आचार्य रामकृष्णदास लहवितकर ट्रस्ट व देहूकर फडाच्या वतीने यावर्षीचा सद्गुरू सोपानकाका देहूकर संतप्रभृती पुरस्कार संत तुकाराम महाराजांचे वंशज बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या हस्ते संतवीर बंडातात्या महाराज कराडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष अॅड.रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांना देऊन गौरवण्यात आले. सन्मानपत्र, पंचवस्त्र, स्मृती चिन्ह व 51 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी देहू संस्थान चे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, चैतन्य महाराज देगलूरकर, केशवदास महाराज नामदास, शिवाजीराव मोरे, मुरलीधर पवार, अनिल काका बडवे, अभय महाराज अमळनेरकर, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, रविंद्र महाराज हरणे, उद्धव महाराज जुनारे, सम्राट पाटील, ज्ञानेश्वर हरणे यांच्यासह वारकरी भाविक उपस्थित होते. ट्रस्टचे निमंत्रक गंगाधर जाधव यांनी प्रास्ताविक केले. रामकृष्ण महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.
चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आपल्या भाषणात कर्म, ज्ञान व भक्ती यांचा समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे. लोकांना संतांच्या चरणाजवळ पोहचवणे ही संत सेवाच आहे. अशा समन्वयवादी वारकरी संप्रदायाची सेवा भैय्यासाहेब रविंद्र पाटील सदैव निःस्पृहतेने करीत आहेत. निश्चितच ट्रस्टने दिलेला पुरस्कार योग्य व्यक्ती ला दिल्याबद्दल गौरवोद्गार काढले. पुरस्काराला उत्तर देतांना भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात मिळालेला हा पुरस्कार माझा सन्मान नसून आईसाहेब मुक्ताबाई फडाची निष्काम सेवा करणाऱ्या वारकरी भाविकांचा हा सन्मान आहे असे भावोत्कट प्रतिपादन केले. त्यांनी देहूकर फड व ट्रस्ट चे आभार मानून पुरस्काराची रक्कम मुक्ताबाई चरणी अर्पण केल्याचे जाहीर केले.
संतवीर बंडातात्या कराडकर महाराज यांनी अध्यक्षीय भाषणात पुरस्काराची व्यापकता अधिक व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रमोद अण्णा जगताप यांनी सुत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.