Solapur News : आई-वडिलांच्या स्वप्नांची तब्बल 41 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुर्ती

आई-वडिलांच्या स्वप्नांची तब्बल 41 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुर्ती करत स्वखर्चातून साकारलेल्या रिद्धी सिद्धी महागणपती मंदिरामुळे गणेश भक्तांच्या दर्शनाबरोबर तालुक्यात पर्यटना व आर्थिक उत्पन्नात भर टाकणारी नवीन वास्तू ठरली.
after 41 year ridhi siddhi mahaganpati temple build ganesh jayanti
after 41 year ridhi siddhi mahaganpati temple build ganesh jayantiSakal
Updated on

मंगळवेढा : आई-वडिलांच्या स्वप्नांची तब्बल 41 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुर्ती करत स्वखर्चातून साकारलेल्या रिद्धी सिद्धी महागणपती मंदिरामुळे गणेश भक्तांच्या दर्शनाबरोबर तालुक्यात पर्यटन व आर्थिक उत्पन्नात भर टाकणारी नवीन वास्तू ठरली.

मंगळवेढ्याबाहेर घरासाठी बांधकाम करत असताना उजव्या सोंडेची गणेश मूर्ती सापडली.ती वेळ एक चांगला साक्षात्कार समजून त्यांनी ब्राह्मण पंडीताकडून माहिती घेतली असता त्यांनी या जागेमध्ये त्यांनी मंदिर बांधण्यास सांगितले.

आई-वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी अशोक कोळी यांनी मोठा संघर्ष केला अखेर या मंदिराचे बांधकाम पूर्ण करून दाखवले. त्यासाठी आर्थिक तरतूद नसताना देखील धाडसाने कल्याणजवळ सुरू असलेल्या जैन मंदीराचे राजस्थान मधील मोहनलाल सोमपुरा

मुंडारा ता. बाली जि. पाली मधील शिल्पकाराची भेट झाली त्या मंगळवेढ्यातील शिल्पकाराला जागा दाखवल्यानंतर वयाच्या 30 वर्षी 1984 साली अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सुरू केलेल्या या मंदिराचे काम वयाच्या सत्तरीनंतर पूर्ण करून दाखवले.

मंदीराचे स्वप्न बाळगलेल्या आईचे 2014 ला आधार तुटला. 40 गुंठे क्षेत्रांमध्ये संपूर्ण मार्बलचे देखणे मंदिर मंगळवेढा -पंढरपूर रोडवर साकारले.सध्या मंगळवेढ्यातील अनेक भाविक संकष्टीच्या निमित्ताने पंढरपूरातील पकालपूर व अन्यत्र जाणाय्रा भाविकांच्या गणेश दर्शनाची सोय झाली.

या मंदिरामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मातील तब्बल 56 मुर्त्या बसवल्यामुळे सर्व संत महात्म्याचे दर्शन देखील एकाच ठिकाणी होणार आहे.त्यामुळे रिद्धी सिद्धी महागणपती मंदिराकडे सातत्याने भाविकांचा ओढा कायम राहण्यास मदत होणार आहे.शिवाय या परिसरामध्ये नवीन व्यवसायाची निर्मिती होणार आहे त्यातून रोजगाराच्या नवीन संधी बेरोजगारांना निर्माण होणार आहेत त्यामुळे तालुक्याच्या अर्थकारणाला गती प्राप्त होणार आहे.

अशोक कोळी यांचा धार्मिक वृत्ती बघून बांधकामास होकार दिला अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे देखणे मंदिर मी हयात असताना साकारले या बांधकामासाठी मी तब्बल 40 वर्ष मंगळवेढ्यात वास्तव्य केले आणि आज मंदिर पूर्ण झाल्याचे मला मोठे समाधान लाभले.

- मोहनलाल सोमपुरा,शिल्पकार,राजस्थान

आई-वडिलांच्या आग्रहाबद्दल मंदिराचे काम अनेक अडचणीवर मात करून हे मंदिर मंगळवेढेकरांच्या स्वाधीन करत असल्याचा मला मोठा आनंद आहे.भविष्यात निराधार,गरजू विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षणाचा भार कमी करण्यासाठी. मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील.

- अशोक कोळी, अध्यक्ष रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.