आमदार प्रणिती शिंदेंची महाराजांवर टीका! लोकसभा निवडणूक लढणार का?

चार राज्यातील विधानसभा निवडणुकीरून सत्ता मिळाल्यानंतर भाजपने लोकसभेच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. केंद्रात कॉंग्रेसची ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार असणार आहे. सुशिलकुमार शिंदे यांच्यानंतर सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणितींना संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपचे खासदार डॉ. महास्वामींना टार्गेट केल्याचीही चर्चा आहे.
PRANITI SHINDE SUSHILKUMAR SHINDE
PRANITI SHINDE SUSHILKUMAR SHINDEESAKAL
Updated on

सोलापूर : देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले. 2014 च्या निवडणुकीत ऍड. शरद बनसोडे तर 2019 च्या निवडणुकीत डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. तो पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आणि त्यांनी राजकारणातून स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर कॉंग्रेसची धुरा आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर पडली. आगामी निवडणूक कॉंग्रेसला सोपी होईल, यादृष्टीने आमदार प्रणितींनी महाराजांना टार्गेट करायला सुरवात केली आहे. प्रदेशाध्यक्षांसमोर बोलताना त्यांनी महाराज व योगींचा समाचार घेत ते राजकारणात आल्यानेच देशाचे वाटोळे झाल्याचे वक्‍तव्य केले.

PRANITI SHINDE SUSHILKUMAR SHINDE
सोलापूर : रस्त्यांवर वाहनांची विनाकारण अडवणूक

भाजपने आतापासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. जात पडताळणी प्रमाणपत्रावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले खासदार डॉ. महास्वामी हे 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपकडून पुन्हा उमेदवार असतील, याबद्दल सध्या कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही. तरीही, भाजपने राज्यातील विविध प्रश्‍नांच्या माध्यमातून राज्य सरकारला कोंडी पकडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याच धर्तीवर कॉंग्रेसला प्रयत्न करावे लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक होणार असल्याने लोकसभेचा विजय खूप महत्त्वाचा मानला जातो. तत्पूर्वी, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक होईल. या निवडणुकीत कॉंग्रेसला आपली ताकद दाखवावी लागणार आहे. सध्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावरच पक्षाची संपूर्ण धुरा असून त्यांना ग्रामीणमध्येही पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी वेळ काढावा लागणार आहे. त्यांना मंत्रिपद मिळाल्यास निश्‍चितपणे पक्षाला बळकटी येईल आणि पुढील निवडणुकांमध्ये यश मिळवण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून त्यांना मंत्रिपद मिळेल का, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. दरम्यान, चार राज्यातील विधानसभा निवडणुकीरून सत्ता मिळाल्यानंतर भाजपने लोकसभेच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. केंद्रात कॉंग्रेसची ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार असणार आहे. सुशिलकुमार शिंदे यांच्यानंतर सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणितींना संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपचे खासदार डॉ. महास्वामींना टार्गेट केल्याचीही चर्चा आहे.

PRANITI SHINDE SUSHILKUMAR SHINDE
आमदार प्रणिती म्हणाल्या, योगी, महाराज राजकारणात आल्यानेच देशाचे वाटोळे

2024 चा लोकसभेचा उमेदवार कोण?
कॉंग्रेसकडून सातत्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीयमंत्री सुशिलकुमार शिंदे यांना उमेदवारी मिळाली. पण, आता त्यांनी यापुढे निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केल्याने तेवढा तुल्यबळ उमेदवार कॉंग्रेसकडे कोण, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. आता भाजपने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली असून कॉंग्रेसलाही तगडा उमेदवार शोधावा लागणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर आयात उमेदवार उभा केल्यानंतर पक्षाला पुन्हा एकदा मोठा फटका बसू शकतो. पण, अद्याप कॉंग्रेसने संभाव्य उमेदवाराला समोर आणलेले दिसत नाही. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा निवडून आल्यानंतर त्याठिकाणी आमदारकीच्या संधीची अनेकजण वाट पाहत आहेत. दुसरीकडे अभ्यासू, आक्रमक, विकासाच्या मुद्‌द्‌यावर संघर्ष करून तो प्रश्‍न मार्गी लावण्याचे कौशल्य आमदार प्रणिती शिंदेंकडे आहे. त्यामुळे लोकसभेला आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असाही अंदाज बांधला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()