Maratha-Kunbi Certificate : करमाळ्यात कुणबी मराठा दाखल्यासाठी एजंट घेतात 50 हजार रूपये

सात महिन्यापासून करमाळा तहसीलदार कारभार प्रभारी तहसीलदारावर
agent charges 50 thousand rupees for Kunbi Maratha certificate in Karmala maratha reservation
agent charges 50 thousand rupees for Kunbi Maratha certificate in Karmala maratha reservationEsakal
Updated on

करमाळा : एका बाजूला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या कार्य संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने सुरू असतानाच करमाळा तहसील कार्यालयात मात्र कुणबी मराठा दाखले काढण्यासाठी एजंट 50 हजार रुपये घेत असल्याचा आरोप बहुजन सेनेचे राजाभाऊ कदम यांनी केला आहे.

करमाळा तहसील कार्यालयाचे तहसीलदार पण गेली सात महिन्यापासून रिक्त असून प्राभारी तहसीलदारावरती येथील कारभार सुरू आहे आत्तापर्यंत करमाळा तालुक्याचे तहसीलदार पद पंधरा दिवसापेक्षा जास्त कधीही प्रभारी तहसील दाराकडे देण्यात आले नाही मात्र पहिल्यांदाच एवढ्या दिवस ही तहसीलदार पद रिक्त आहे विशेष म्हणजे करमाळा तहसीलदार म्हणून येण्यासाठी अनेक तहसीलदार इच्छुक आहेत तरी देखील करमाळा तहसीलदार पद रिक्त आहे.

करमाळा तहसील कार्यालयाला कायम स्वरूपी तहसीलदार मिळवा म्हणून पालकमंञी ,खासदार,आमदार यांच्या नावाने बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंबी आंदोलन करण्यात आले. यावेळी राजाभाऊ कदम यांनी कुणबी मराठा दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयात एजंटचा सुळसुळाट असून एक दाखला काढून देण्यासाठी 50 हजार घेतले जात असल्याचे जाहीरपणे वक्तव्य केले आहे.

एजंटांकडून घेतल्या जाणाऱ्या 50 हजार रुपयांची वाटणी कशा पद्धतीने केली जाते याची चर्चा गेली अनेक महिन्यापासून करमाळा तहसील कार्यालयाच्या परिसरात सुरू असते मात्र याच्यावरती कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नव्हते मात्र यावर बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने आवाज उठवण्यात आला आहे

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर ,आमदार संजय शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत बोबाबोंबी अंदोलन करण्यात आले. यावेळी अॅड. राहुल कांबळे, अंगद लांडगे , कालिदास कांबळे ,तुकाराम घोंगडे, ,नवनाथ खरात,अधिक शिंदे,विष्णू रणदिवे,रवी घोडके सरपंच मनोहर कोडलिंगे, दत्ता गव्हाणे बापू पवार ,संदीप मारकड ,दादा गायकावड ,

दत्ता राक्षे,बटू हजारे,सुंदरदास काळे,चंद्रशेखर पाटील,अर्जुन भोसले,विनोद शिंदे,प्रदीप शिंदे,मनोहर शिंदे,अशोक शिंदे,प्रेमचंद कांबळे,संतोष लांडगे,बापू गायकवाड,दादा गायकवाड,संतोष गायकवाड,उपस्थित होते.

यावेळी बोलताना बहुजन संघर्ष सेनेचे राजेभाऊ कदम म्हणाले,गेली सात महिन्यापासून तहसीलदार पदाची नियुक्ती झाली नसल्याने प्रभारी तहसीलदार नायब तहसीलदार विजयकुमार जाधव हे कारभार चालवत आहेत.

या तहसील कार्यालयाला कायमस्वरूपी तहसीलदार मेळावा म्हणून आमदार ,खासदार ,पालकमंत्री कोणीही प्रयत्न करायला तयार नाहीत प्रत्येक जण आपापल्या राजकारणात मसगुल आहेत. तहसीलदार नेमक्या कोणाच्या शिफारशीने आणायचा यावरून करमाळ्याचे तहसीलदार पद रिक्त असल्या चे सांगितले जात आहे.

शेतकऱ्यांच्या रस्ता केसचा निकाल वेळेत लागत नाही, जमिनीचे तक्रारीचे निवारण वेळेत होत नाही, रेशन कार्ड वेळेत लोकांना मिळत नाही, अन्नसुरक्षेमध्ये रेशन कार्ड समाविष्ट करण्यात विलंब होत आहे,

बारा अंकी नंबर लोकांना दोन चार चार महिने मिळत नाही, पी एम किसान चे पैसे लोकांना वेळेत मिळत नाही, संजय गांधी निराधार चे प्रकरण वेळेत मंजूर होत नाही, निराधार लोकांचे अनुदान वेळेत मिळत नाही, अशी तहसील कचेरी मध्ये असलेलि विविध कामे वेळेत होत नसल्याने तालुक्यातील नागरिक त्रस्त आहेत याकडे आमदार खासदार पालकमंत्र्यांचे लक्ष नाही.

मराठा कुणबी दाखले काढून देण्यासाठी एजंटाचा सुळसुळाट सध्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत आंदोलने सुरू आहेत अशा परिस्थितीत कुणबी मराठा नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे मात्र या नोंदी नेमक्या कोणाच्या सापडल्या ह्या अद्यापही स्पष्ट झालेले नाही .याशिवाय कुणबी मराठा दाखले काढून देण्यासाठी करमाळा तहसील कार्यालयात एजंटचा सुळसुळाट उठला असून एका दाखल्यासाठी 50 हजार रुपये द्यावे लागतात ही पिळवणूक अनेक वर्षापासून सुरू आहे यावरही राजाभाऊ कदम यांनी लक्ष वेधले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.