Mangalwedha News : अवैध धंदे रखडलेला तपासावरून पोलीस निरीक्षकाच्या बदलीसाठी धरणे आंदोलन

पोलीस ठाण्याचा दुसऱ्यांदा पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षक रणजित माने कार्यकालात अवैध व्यवसायात वाढ होत अनेक गंभीर गुन्ह्याचा तपास लावण्यात अपयश.
agitation
agitationsakal
Updated on

मंगळवेढा - येथील पोलीस ठाण्याचा दुसऱ्यांदा पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षक रणजित माने कार्यकालात अवैध व्यवसायात वाढ होत अनेक गंभीर गुन्ह्याचा तपास लावण्यात अपयश आल्याने या प्रकरणी निलंबित करून कारवाई करावी या मागणीसाठी शहरातील नागरिकांच्या वतीने पोलीस स्टेशन समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.

या आंदोलनात खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे,ऋतुराज बिले, बिरुदेव घोगरे,दिलीप उघाडे, संजय जगताप, अमित गवळी धन्यकुमार पाटील,संभाजी लवटे,सर्जेराव गाडे,सिध्देश्वर हेंबाडे,तात्या घोडके,राम ताड,महादेव ताड, मनोज चव्हाण, धनंजय पवार,सहभागी झाले.

याबाबतचे निवेदन पोलीस महासंचालक यांना देण्यात आले असून या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, 12 जानेवारी 2022 रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशनचा पदभार पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी घेतल्यानंतर तालुक्यामध्ये दिवसाढवळ्या अनेक घरफोड्या झाल्या आहेत.

त्यापैकी बऱ्याचशा घरफोड्यांचा अद्याप तपास लागला नाही, निंबोणी येथील कामू पाटील यांचा खून होऊन एक वर्ष उलटले तरीही अर्थीक तडजोड करून खुनाचा गुन्हा दाखल न करता, आरोपीना मोकाट सोडून दिले, परप्रांतीय चार वर्षीय रणवीरकुमार साहू या बालकाचे दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी

अपहरण झाले त्याचाही अ‌द्याप तपास लागला नाही. तालुक्यामध्ये अवैद्य मटका अवैध गुटखा, अवैध दारू, अवैध वाळू वाहतूक, अवैधरित्या कत्तल खाण्याला जाणाऱ्या जनावराची वाहतूक, शेजारीच असलेल्या कर्नाटक राज्यातून होणारी गुटख्याच्या वाहनांची वाहतूक,तीन ते चार ठिकाणी वेश्या व्यवसायाचे अड्डे सुरू करण्यास मंथली हप्ते घेत असल्याची तक्रार केल्यानंतर महामार्गावरील हॉटेल ज्ञानेश्वरी लॉज वर चालणाय्रा वेश्याव्यवसायावर कारवाई केली.

त्यामुळे अनेक गंभीर होण्याचा तपास लावण्यात त्यांना अपयश आले पोलीस निरीक्षक माने हे जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांचे अनेक राजकीय पुढाऱ्याशी संबंध असल्यामुळे त्या माध्यमातून ते दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या निवेदनात नमूद केले.

यापूर्वी सर्वपक्षीय पदाधिकाय्रांनी कोल्हापूर येथे महापरिक्षेत्र कार्यालयासमोर धरणे आंदोलन केल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने यांची कंट्रोल रूमला बदली करण्यात आली. त्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्याकडे हा पदभार देण्यात आला होता त्या कालावधीत देखील यातील काही गुन्ह्याचा तपास लागला नाही त्यानंतर पुन्हा रणजीत माने यांना मंगळवेढा पोलीस स्टेशनचा पदभार देण्यात आला. आठ महिन्यानंतर रखडलेला तपास व अवैद्य धंद्यावरून आंदोलन सुरू झाले.

आंदोलन कर्त्याचे निवेदन प्राप्त झाले असून या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

- डॉ. अर्जुन भोसले, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.