Inflation : डाळीच्या आमटीला महागाईची फोडणी

तुटवड्यामुळे डाळींच्या किमती भडकल्या; क्विंटलमागे ३०० ते ३५० रुपयांनी वाढ
grains
grainsSakal
Updated on

केत्तूर : बाजारात तुटवडा असल्यामुळे तूरडाळ, हरभरा डाळ, मूगडाळ आणि उडीद डाळीच्या दरात मोठी वाढ होत आहे. डाळींच्या दरात क्विंटलमागे ३०० ते ३५० रुपयांनी वाढ झाल्याने सर्वसामान्यांना रोजच्या जेवणात आमटी खाणेही अवघड झाले आहे.

सध्या डाळींना सर्वसाधारण मागणी असली तरीही गतवर्षी वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे व अतिवृष्टीमुळे डाळीचे पीक वाया गेल्याने उत्पादन घटले आहे. हरभरा डाळीच्या दरातही २०० रुपयांनी वाढ झाल्याने बेसन दरात ५० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बेसनाचे दर ७५ ते ८० रुपये प्रतिकिलो असा झाला आहे. यावर्षी तुरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे हंगाम काळापासून तूर डाळीचे दर वाढतच आहेत. आताही त्यामध्ये वरचेवर वाढ होत आहे.

grains
America Economic Crisis : अमेरिकेच्या कर्ज मर्यादेचे संकटावर लवकरच मार्ग - ज्यो बायडेन

सध्या बाजारात आवक कमी होत असून उत्पादन केंद्रातही दरवाढ सुरूच आहे. मागणी वाढल्याने उडीद डाळीच्या दरातही वाढ होत आहे. उडीद व तूरडाळीच्या साठ्यावर सरकारने मर्यादा आणल्याने येणाऱ्या काळात हा दर मोठ्या प्रमाणावर वाढणार नाही, असा अंदाज किराणा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त आहे. एकाच महिन्यात २५ ते ३० रुपयांनी वाढ झाल्याने डाळींना मागणी कमी झाली आहे. ही दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने तूर, उडीद डाळीच्या साठ्यावर निर्बंध आणले आहेत. डाळीचे दर वाढत असतानाही खाद्यतेलाचे दर मात्र कमी होत असल्याने गृहिणींना दिलासा दिला आहे.

देशांतर्गत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक या राज्यात डाळींचे जास्त प्रमाणात उत्पादन होते. परंतु, या हंगामात अतिवृष्टीचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे डाळवर्गीय पिके वाया गेल्याने त्याचा परिणाम डाळीचे दर वाढण्यावर होत आहे.

grains
Grain News : तीन महिन्यांच्या धान्यापासून लाभार्थी वंचित : आमदार कुणाल पाटील

‘हातावर तुरी देणे’ सत्यात

तूरडाळ ही तशी गरिबांची आहे. प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाच्या जेवणात डाळीची आमटी हमखास असते. पण गेल्या दोन वर्षात गरिबांच्या हातातून तूरडाळ निसटली आहे. तूरडाळीचे दर आता गोरगरिबांना परवडणारे राहिले नाहीत. दरवाढीमुळे तूरडाळीने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊन ‘हातावर तुरी देणे’ हा वाक्प्रचार सत्यात आणला आहे.

डाळींचे सध्याचे बाजार भाव

  • तूरडाळ १४० ते १४५

  • हरभरा डाळ ७५ ते ९०

  • मूगडाळ १०० ते ११०

  • मसूर डाळ ८० ते ९०

  • मटकी डाळ १०० ते ११०

  • उडीद डाळ ११० ते १२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.