Solapur Crime : शेतीच्या वादातून चुलत्याचा खून, शेवरे येथील घटना; आरोपींच्या शोधासाठी पाेलिसांचे पथक रवाना

शेतीच्या कारणावरून पुतण्याने चुलत्याच्या गळ्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला.
agriculture land dispute brother killed brother police crime solapur tembhurni
agriculture land dispute brother killed brother police crime solapur tembhurniesakal
Updated on

टेंभुर्णी : शेतीच्या कारणावरून पुतण्याने चुलत्याच्या गळ्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. चुलत्याचे मुंडके धडावेगळे करून जाताना ते बरोबर घेऊन गेला. माढा तालुक्यातील शेवरे येथे आज (सोमवारी)सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून,

टेंभुर्णी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाली आहेत. शंकर प्रल्हाद जाधव (वय-६५, रा.कुरणवस्ती शेवरे, ता.माढा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

टेंभुर्णी पोलिस ठाण्यात मयताचा नातू नरहरी नवनाथ बंडलकर (वय २३, रा.कुरणवस्ती शेवरे, ता.माढा) यांनी फिर्याद दाखल केली असून, शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर बाबासाहेब जाधव, अजित बाबासाहेब जाधव, आकाश बाबासाहेब जाधव (रा.कुरणवस्ती शेवरे, ता.माढा) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की नरहरी बंडलकर याचे आजोबा शंकर प्रल्हाद जाधव व गुन्ह्यातील आरोपी यांच्यात शेतीच्या कारणावरून सतत वाद होत होते. दोन वर्षापूर्वी यासंदर्भात माढा येथील न्यायालयात दावा दाखल केलेला आहे.

मयत शंकर ऊर्फ बिटू प्रल्हाद जाधव यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया केल्याने घरात झोपले होते. घरातील आजी, मामा व इतर सर्व लोक शेतात गेले होते. सोमवारी सकाळी साडे दहा ते पावणे अकराच्या सुमारास फिर्यादी ओट्यावर बसला असताना, समाजातील शिवाजी जाधव, परमेश्वर जाधव, अजित जाधव, आकाश जाधव हे सर्वजण आजोबांच्या घरात घुसले.

यावेळी शिवाजी जाधव यांच्या हातात कुऱ्हाड होती. आजोबांना ते मारहाण करतील असा संशय आल्याने फिर्यादीने भितींपासून वाकून पाहिले असता शंकर जाधव यांना परमेश्वर जाधव, अजित जाधव व आकाश जाधव यांनी पकडून ठेवले होते. त्यावेळी शिवाजी जाधव याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने शंकर जाधव यांच्या गळ्यावर वार करून त्यांचे मुंडके धडा वेगळे करून त्यांचा निर्घृण खून केला.

agriculture land dispute brother killed brother police crime solapur tembhurni
Solapur Sugar Factory : साखर उद्योगाच्या मदतीला पवार की फडणवीस?

यानंतर त्यांचे मुंडके घेऊन जात असताना नरहरी बंडलकर यांनी पाहिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. यानंतर अमोल शंकर जाधव यांना फोन करून तुम्ही लगेच घरी या असे फिर्यादीने सांगितले.

खून प्रकरणातील मयत शंकर जाधव यांचे धडावेगळे केलेले मुंडके व मोटारसायकल सायंकाळी माळीनगर येथील एका शेतामध्ये पोलिसांना मिळून आली आहे. गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाले असून, पोलिसांची पथके आरोपींचा कसून शोध घेत आहेत. लवकरच या आरोपींना अटक करण्यात येईल.

- अजित पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, करमाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.