फ्लाय ९१ ने संभाव्य दरपत्रक नुकतेच त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. हे संभाव्य दर स्वस्तात आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या बजेटमध्ये आहेत.
सोलापूर : गोवा येथील फ्लाय ९१ या विमानसेवा (Airline) देणाऱ्या कंपनीने (Fly 91 Company) सोलापूर-गोवा आणि सोलापूर-मुंबई या फेऱ्या २३ डिसेंबरपासून सेवा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले असून संभाव्य दरपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामधील प्रारंभिक दर हे ट्रॅव्हल्सच्या दराइतकेच आहेत. प्रवासाच्या तारखेच्या किमान तीन ते चार महिने अगोदर तिकिटे काढल्यास दर अत्यंत कमी मिळतात.