सोलापूर, : भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे सोलापूर (होटगी रोड) विमानतळ व सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्यात १ हेक्टर १७ आर जागेवर वाद सुरू होता. या वादावर महसूलचे उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी निकाल देत, वादात असलेली जागा १ हेक्टर १७ आर ही विमानतळाची असल्याचे सांगितले. दिवाणी न्यायालयातील प्रकरणाचा आधार घेत त्यांनी हा निकाल दिला आहे. या निकालानुसार आज उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने सोलापूर विमानतळाच्या अधिकाऱ्यांना या जागेचा ताबा देण्यात आला आहे.