Solapur : शहर आराखड्यावरून माजी नगरसेवकाचा उपोषणाचा इशारा

ठराव रद्द करावा अन्यथा 1 जून पासून नगरपालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा माजी नगरसेवक अजित जगताप यांनी निवेदनाद्वारे दिला.
ajit jagtap
ajit jagtapsakal
Updated on

मंगळवेढा : शहर विकास आराखड्यामध्ये प्रशासक व मुख्याधिकारी यांनी गल्ली बोळातून रस्त्याचे रुंदीकरणाचा प्रस्तावित बदल ठराव क्र 138 दि. 9 मे 2023 करून नागरिकावर अन्याय केला.सदरचा ठराव रद्द करावा अन्यथा 1 जून पासून नगरपालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा माजी नगरसेवक अजित जगताप यांनी निवेदनाद्वारे दिला.

या संदर्भातील निवेदन प्रशासक व मुख्याधिकारी यांना दिले असून त्यामध्ये म्हटले आहे की,शहराची विकास योजना 1 जानेवारी 1991 रोजी अस्तीत्वात आली.त्यानुसार दर 20 वर्षांनी विकास योजना सुधारीत करणे आवश्यक असते. त्यानुसार 28 ऑक्टोबर 2021 रोजी विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करण्यात आला.

ajit jagtap
Solapur : रेल्वे प्रवाशांनी ऊन, पावसात थांबायचे कुठे?

त्यानुसार नगर रचना अधिकारी यांनी 14 सप्टेंबर 22 रोजी प्रारूप विकास योजनेची प्रत नागरीकांच्या हरकतीसाठी नगरपरिषदेकडे दिली.त्यानुसार या आराखड्यावर 230 नागरीकांनी हरकती व सूचना दिल्या. त्यानंतर नगर रचना कार्यालय,

सोलापूर यांनी समिती गठीत करून 8 व 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत रोजी हरकतीवरती सदर समितीने सुनावणी घेवून 28 फेब्रुवारीला नगरपरिषदेस सुनावणीचा अहवाल देताना सदर समितीने वैद्यानिक पुरावे पडताळून व प्रत्यक्ष जागेची पाहणी करुन घेवून नियोजन प्राधिकरण म्हणजेच नगरपरिषद प्रशासक व मुख्याधिकारी यांनी स्वतंत्र निर्णय घ्यावा असा निर्णय दिला.

प्रशासक व मुख्याधिकारी यांनी शहराची प्रारूप विकास योजनेतील प्रस्तावित आरक्षण असलेल्या जागा वगळून शासकीय जागेवरती आरक्षण प्रस्तावित करणेचा ठराव प्रशासकीय सभेमध्ये करण्यात आला आहे.

शहरातील गल्लीत 12 मी रुंदीचा रस्ता प्रस्तावीत आहे परंतू सदर रस्ता वापरात असलेल्या रुंदीचा ठेवावा अशा हरकती शहरातील नागरीकांनी घेतल्या. त्या हरकतीचा विचार होवून प्रशासक व मुख्याधिकारी यांनी सदर ठरावामध्ये 12 मी. रुंदीचा रस्ता ऐवजी 9 मी. रुंदीचा रस्ता प्रस्तावित करून त्यास ठरावाव्दारे चुकीची मंजूरी देण्यात आली.

ajit jagtap
Solapur : रेल्वे प्रवाशांनी ऊन, पावसात थांबायचे कुठे?

वास्तविक पाहता शहरातील मुख्य रस्त्याची रुंदी भविष्याचा विचार करुन प्रस्तावित करणेस नागरीकांची हरकत नाही. परंतू गल्लीतील 11 लहान रस्ते 9 मी. म्हणजेच 30 फुट रुंदीचे केल्यास सुमारे 500 कुटुंबे ही बेघर होतील याचा विचार प्रशासनाने विचार न करता मनमानी केली.

शहरामध्ये नियमानुसार कामकाज केले असून यापुढेही नियमानुसार कामकाज करणार आहे.रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत नगररचना अधिनियमानुसार अंमलबजावणी केली.

- निशिकांत प्रचंडराव,मुख्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.