Kartiki Ekadashi: अजित पवार की देवेंद्र फडणवीस? कार्तिकी एकादशीला महापूजा मान कोणाला? मंदिर समितीसमोर मोठा पेच

यंदा कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान कोणाला मिळणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे
Kartiki Ekadashi
Kartiki EkadashiEsakal
Updated on

सध्या राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे पहिल्यादांच एक पेच निर्माण झाला आहे. कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर रोजी येणार असून याच्या तयारीसाठी मंगळवारी मंदिर समितीची बैठक पार पडली. राज्यात आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना मिळणार याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरवर्षीप्रमाणे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते पार पडते. यावर्षी दोन उपमुख्यमंत्री असल्याने हा मान कोणाला द्यायचा हा प्रश्न मंदिर समितीसमोर निर्माण झाला आहे. तर गेल्या कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली होती. त्यामुळे आता हा पूजेचा मान कोणाला मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागले आहे.

कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्याला मिळणार यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. मात्र यावर तोडगा न निघाल्याने अखेर विधी आणि न्याय विभागाचा सल्ला घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

Kartiki Ekadashi
Ajit Pawar: ‘अजितदादांकडे गेलो मात्र.., त्या बैठकीशी माझा संबंध नाही’, शरद पवार गटाच्या आमदाराने सांगितलं भेटीचं कारण

राज्यात सध्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. तर कार्तिकी एकादशीच्या पूजेला एकाच उपमुख्यमंत्र्यांनी बोलवावे लागणार आहे. मागील कार्तिकी यात्रेच्या पूजेचा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला होता. यावर्षी दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे नेमकं कोणत्या उपमुख्यमंत्र्याना बोलवावं या पेचात मंदिर समिती सापडली आहे. कोणत्याही एका उपमुख्यमंत्र्याला बोलावल्यास दुसरा नाराज होण्याची शक्यता आहे, असे होऊ नये यासाठी मंदिर समिती राज्याच्या विधी व न्याय विभागाचा सल्ला घेणार आहे.

दरम्यान आम्हाला दोन्ही उपमुख्यमंत्री तेवढेच मानाचे आहेत. विधी व न्याय विभाग जो निर्णय देईल त्यानंतर कार्तिकी महापूजेचे निमंत्रण त्या उपमुख्यमंत्र्यांनी दिले जाईल असे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.

Kartiki Ekadashi
Pune News : पुण्यातील ससूनमधून पळालेल्या ड्रग्स पेडलर प्रकरणी धक्कादायक माहिती समोर; पुणे पोलिसांनी...

कार्तिकी एकादशी २३ नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते सपत्नीक 'श्रीं'ची शासकीय महापूजा केली जाणार आहे. कार्तिक यात्रा कालावधी १४ ते २७ नोव्हेंबर असा राहणार आहे. यात्रा कालावधीतील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरांचे पालन करून भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. 

Kartiki Ekadashi
Cloud Burst in Sikkim : सिक्किममध्ये ढगफुटीमुळे प्रलय! पुरात लष्कराचे २३ जवान बेपत्ता, शोध मोहिम सुरू

भाविकांना मिळणार या सुविधा

या यात्रा कालावधीत सुमारे १० ते १२ लाख भाविक येतात. यात्रेत होणारी गर्दी लक्षात घेऊन परंपरेनुसार १६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत २४ तास दर्शन, शासकीय महापूजेचे नियोजन, दर्शनरांग व्यवस्थापन, लाइव्ह दर्शन व्यवस्था, आपत्कालीन व सुरक्षा व्यवस्था, देणगी व्यवस्था, निवास व्यवस्था, भाविकांची अपघात विमा पॉलिसी, स्वच्छता व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाडूप्रसाद व्यवस्था, मोफत चहा व खिचडी वाटप व इतर अनुषंगिक व्यवस्था भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.