Natya Sammelan : पिंपरी चिंचवडच्या नाट्यसंमेलनात मंगळवेढा शाखेचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी चिंचवड येथे 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 5 ते 7 जानेवारी दरम्यान झाले.
akhil bhartiya marathi 100th natya sammelan mangalwedha branch 35 member participate
akhil bhartiya marathi 100th natya sammelan mangalwedha branch 35 member participateSakal
Updated on

मंगळवेढा : पिंपरी चिंचवड (पुणे) येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात नियामक मंडळ सदस्या तेजस्विनी कदम यांच्या नेतृत्वाखाली नाट्य परिषदेच्या मंगळवेढा शाखेतील 35 सदस्यांनी नाट्यसंमेलनात सहभाग नोंदवला.

 पिंपरी चिंचवड येथे 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 5 ते 7 जानेवारी दरम्यान झाले. या कार्यक्रमास स्वागताध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित

अध्यक्ष डॉ जब्बार पटेल यांच्यासह अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई अध्यक्ष प्रशांत दामले उपाध्यक्ष नरेश गडेकर उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर प्रमुख कार्यवाह अजित भुरे कोषाध्यक्ष सतीश लोटके यांच्यासह मराठी नाट्य व सिनेसृष्टीतील कलावंत उपस्थित होते.

या नाट्य संमेलनाचा शुक्रवारी सायंकाळी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अस्तित्व हे नाटक सादर झाले,तर ग दि माडगूळकर नाट्यगृहांमध्ये पालशेची विहीर हे प्रायोगिक नाटक सादर झाले.शिवराज्याभिषेक सोहळा मुख्य रंगमचावर झाला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत झाली.कार्यक्रमास नियामक सदस्या तेजस्विनी कदम उपस्थित होत्या शनिवारी सकाळी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मुख्य कार्यक्रम स्थळी झालेल्या नाट्य दिंडीत मंगळवेढा शाखेचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी नाट्यसंमेलनाच्या कार्यक्रमा दरम्यान विविध रंगमंचावर होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती मंगळवेढा शाखेतील सदस्यांना मंगळवेढा शाखेचे यतीराज वाकळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()