कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची रोमहर्षक व बहुरंगी होण्याची चिन्हे दिसत आहेत. ही विधानसभा निवडणूक आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या ‘प्रतिष्ठेची’ तर माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या ‘अस्तित्वाची’ ठरणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. इतरांची शक्ती कमी असली तरी ते भाजप किंवा काँग्रेसच्या जय-पराजयावर परिणाम करू शकत असल्याने यंदाची निवडणूक बहुरंगी होणार आहे.