अक्कलकोट: सदलापूर (ता. अक्कलकोट) येथील बांबू उडी खेळातील गुणी खेळाडू नागम्मा बजे हिची आर्थिक परिस्थिती तिच्या सर्वांगिण प्रगतीच्या आड येत आहे. अशा स्थितीही अनेक मार्गाने कष्ट करीत बाबू उडीत देशाकडून पहिली सुवर्णपदक विजेते होण्यासाठी तिची धडपड सुरू आहे.
मुळात नागम्मा हिचे वडील रविंद्र बजे यांची फक्त दोन एकर शेती असून त्यात जुजबी उत्पन्न मिळते. म्हणून त्यांचे गावातच छोटेसे चहाचे कॅन्टीन सुरू करून घर चालवायचा प्रयत्न करीत आहेत. दररोज त्याचा गल्ला त्यात नफा किती, त्यात घर चालवायचे कसे हा गहन प्रश्न आहे. नागम्मा हिला सातवी-आठवीपासूनच बांबू उडी खेळाची आवड निर्माण झाली. तिने निर्मलराजे कन्या प्रशालेचे शिक्षक प्रकाश सोनटक्के यांचे मार्गदर्शन घेऊन बांबू उडी (POLEVAULT) खेळ शिकणे व वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेणे सुरू केले.
हळूहळू प्रगती साधत आजपर्यंत नागपूर, कऱ्हाड, सातारा, पंजाब, पुणे येथील स्पर्धात सहभाग नोंदवून काही ठिकाणी सुवर्ण पदक जिंकली तर काही ठिकाणी सहभाग दर्शविला. मागे कुणाचेच पाठबळ सुरुवातीस नव्हते पण त्यानंतर जिल्हा क्रीडा कार्यालय, बालाजी अमाईन्स यांनी बांबू घेण्यास व इतर साहित्यासाठी आर्थिक मदत केल्याने तिच्या खेळात हळूहळू सुधारणा होऊ लागले आणि समाजातील धुरिणांनी व सामाजिक संस्थांनी आर्थिक मदत केली. त्यातून तिचा आर्थिक भार हलका होत गेल्याने थोडी प्रगती साधण्यात यश आले आहे. घरची आर्थिक स्थिती बिकट असल्याने सरावासाठी देशभरात जाणे, पूरक आहार व खेळाचे साहित्य घेणे तिला जमत नाही. त्यामुळे अंगी कौशल्य असूनही मोठी झेप घेऊन पुढे जाणे अवघड जात आहे. तिला आता यापुढे देश-विदेश खेळाण्यासाठी त्या दर्जाचा सराव केरळ येथे घेणे गरजेचे आहे.
नेमके यासाठी तिला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. ती सध्या ३ मीटर पेक्षा उंच बांबू उडी मारते. मात्र, तिने ४ ते ४.१० मीटर एवढे उंच मारणे अपेक्षित आहे. हे साध्या करण्यासाठी येणारा खर्च तिच्या पालकांना झेपत नाही. यासाठी विविध लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटना तसेच दानशूर व्यक्तींनी मदत करणे या गुणी खेळाडूच्या हिताचे आहे. तिचे सकाळ व संध्याकाळ पाच ते सहा तास नियमित सराव सुरू केला आहे. तिने यापूर्वी केरळमधील सतिशकुमार यांच्याकडे दोन महिने सराव केला आहे. आता आणखी वर्षभर तिथे तिला सराव करायच आहे, पण मदत मात्र हवी आहे. ती सौ. सुरेखा कल्याणशेट्टी महाविद्यालयात बारावीत शिकते. तिचे डाएट तसेच मानसिक व शारीरिक स्वस्थ्य चांगले राहण्यासाठी आर्थिक मदत हवी आहे. यासाठी दानशूरांनी पुढे यावे, अशी तिची अपेक्षा आहे.
मला कुठल्याही परिस्थितीत देशासाठी बांबू उडीत सुवर्णपदक मिळवायचे आहे. माझे निरंतर प्रयत्न सुरू आहेत. मला आता आणखी वर्षभर तरी केरळ सारख्या चांगली सोय असलेल्या ठिकाणी शिकायचे आहे. मला दानशूर व्यक्ती व सामाजिक संघटना यांनी थोडी मदत करून सहकार्य केल्यास मी निश्चित यशस्वी होईन, यात शंका नाही.
- नागम्मा बजे, सदलापूर, ता. अक्कलकोट
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.