Dhairyashil Mohite-Patil : बटेंगे तो कटेंगे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही : खासदार मोहिते-पाटील

akkalkot vidhan sabha Election 2024 : विद्यमान सरकार ठेकेदार धार्जिणे आहे. पैसे खाण्याला मर्यादा नाही, अशी टीका खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी केली. महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रेंची प्रचारसभा
Dhairyashil Mohite-Patil
Dhairyashil Mohite-Patilsakal
Updated on

अक्कलकोट : या राज्यात जातिधर्मांत तेढ निर्माण करण्याचे काम भाजपने केले आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विद्यमान सरकार ठेकेदार धार्जिणे आहे. पैसे खाण्याला मर्यादा नाही. दोन टक्क्यांनी दरडोई उत्पन्न घसरल्याची टीका खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी केली.

काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारार्थ खासदार मोहिते- पाटील यांची जाहीर प्रचार सभा चुंगी येथे पार पडली. त्यावेळी उपस्थित मतदारांना मार्गदर्शन करताना खासदार ते बोलत होते.

युती सरकारमुळे विकासदर खाली आला. अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेले. खासगी तत्त्वावर नोकरीवर घेतले जाते. शासकीय नोकऱ्या नाहीत. निवृत्त शिक्षकांना घेऊन शाळा चालविण्याची वेळ सरकारवर आली आहे.

त्यामुळे या सरकारला बदलून पहिल्या शंभर दिवसांत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ, बेरोजगार युवकांना चार हजार भत्ता, २५ लाखांपर्यंत विमा, मोफत औषधे, महिलांना महालक्ष्मी योजना आदी लोकसेवेची पंचसूत्री महाविकास आघाडी सरकार पूर्ण करणार असल्याची ग्वाही खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी दिली.

यावेळी मल्लिकार्जुन पाटील, विश्वनाथ भरमशेट्टी, प्रथमेश म्हेत्रे, बंदेनवाज कोरबू, दयानंद काजळे, माया जाधव, दिलीप बिराजदार, दिलीप काजळे, सिद्धार्थ गायकवाड, राजू चव्हाण, शाकीर पटेल, सिद्धाराम भंडारकवठे, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सुनीता दुपारगुडे, तुकाराम दुपारगुडे, अशपाक अगसापुरे, विजय दुपारगुडे, शिवराज गड्डे, विनीत पाटील, स्वामिनाथ कलकोटे उपस्थित होते. मल्लिकार्जुन पाटील, प्रथमेश म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.