Amol Kolhe: महायुतीचे दिवस भरले, सरकारला चले जाव म्हणा, अमोल कोल्हेंचा एल्गार!

कोणतीही योजना लागू करा आणि सरकार वाचवा, अशी गत महायुतीची झाली आहे,
Amol Kolhe: महायुतीचे दिवस भरले, सरकारला चले जाव म्हणा, अमोल कोल्हेंचा एल्गार!
Updated on

Karmala News: महाराष्ट्रातील महायुतीच्या भ्रष्ट, ट्रिपल इंजिन खोके सरकारला चले जाव म्हणायचे आहे. त्यामुळे ९ ऑगस्टला क्रांती दिनादिवशी शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली. ती महायुती सरकारला चले जाव म्हणण्यासाठीच झाली आहे.

या महायुती सरकारचे दिवस भरले आहेत, हे सरकारलाही कळून चुकले आहे. त्यामुळे कोणतीही योजना लागू करा आणि सरकार वाचवा, अशी गत महायुतीची झाली आहे, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केले.

Amol Kolhe: महायुतीचे दिवस भरले, सरकारला चले जाव म्हणा, अमोल कोल्हेंचा एल्गार!
Jayant Patil-Amol Kolhe: जयंत पाटील अन् अमोल कोल्हे क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले, थरारक घटनेचा VIDEO

करमाळा येथे शिव स्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार धैर्यशील मोहीते पाटील, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार कोल्हे म्हणाले, सुप्रिया ताईंविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे करण्याची चूक झाली, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पण आता या चुकीला माफी नाही. खिशात पैसा जास्त झाला म्हणून जनता मामा बनत नाही. आबांशिवाय करमाळ्याच्या जनतेला दुसरं काय जमत नाही, असं म्हणत खासदार कोल्हे यांनी आमदार संजय शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

माजी आमदार नारायण पाटील म्हणाले, करमाळा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून रिटेवाडी उपसा सिंचन योजना झाली पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. विद्यमान आमदार पैशाच्या जिवावर झालेले आमदार आहेत. त्यांना जनतेचे काहीही देणे घेणे नाही. प्रास्ताविक सुनील तळेकर यांनी तर सूत्रसंचालन विनोद गरड यांनी केले.

Amol Kolhe: महायुतीचे दिवस भरले, सरकारला चले जाव म्हणा, अमोल कोल्हेंचा एल्गार!
Amol Kolhe : जुन्नर तालुक्याचा आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल, अन्...; अमोल कोल्हे स्पष्टच बोलले

भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, करमाळा तालुक्यासाठी महत्त्वाचा असलेल्या रिटेवाडी उपसासिंचन योजनेसाठी नारायण पाटील आणि धैर्यशील मोहिते-पाटील तुम्ही नियोजन करा, मी मुंबईला बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावते. आमचे सरकार आल्यावर भ्रष्टाचार मुक्त सरकार देऊ. ज्याच्यावर ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला त्यांना सरकारमध्ये घेऊन आज तुम्ही मांडीला मांडी लावून सरकार चालवताय. हे सरकार फसवे आहे.

Amol Kolhe: महायुतीचे दिवस भरले, सरकारला चले जाव म्हणा, अमोल कोल्हेंचा एल्गार!
MP Amol Kolhe : विधानसभा निवडणुकीत 180 ते 190 जागा महाविकास आघाडी जिंकणार; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.