आंदोलन निर्बंध शिथिलतेचे पण मागणी 'आयुक्‍त हटाव'ची!

आंदोलन निर्बंध शिथिलतेचे पण मागणी 'आयुक्‍त हटाव'ची!
Updated on
Summary

या पार्श्‍वभूमीवर दिलीप माने यांनी आगामी महापालिकेत शिवसेनेचे वर्चस्व असावे, या हेतूने अन्य पदाधिकाऱ्यांना बाजूला सारून शहराच्या प्रश्‍नांवर लक्ष द्यायला सुरू केल्याचीही चर्चा आहे.

सोलापूर : शहरातील कोरोनाची (Corona)परिस्थिती आटोक्‍यात आलेली असतानाही ग्रामीण भागाप्रमाणेच शहरातही निर्बंध कायम ठेवण्यात आले. त्याला विरोध करत व्यापाऱ्यांच्या बाजूने महापालिकेतील विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन (agitation) केले. मात्र, त्याठिकाणी दुकाने सुरू करण्याच्या मागणीच्या तुलनेत 'आयुक्‍त चलेजाव'च्याच सर्वाधिक घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या आडून आयुक्‍तांना हटविण्याचा प्रयत्न केल्याचीही त्याठिकाणी चर्चा होती. (an agitation was organized at the entrance of solapur municipal corporation for restrictions in the city)

आंदोलन निर्बंध शिथिलतेचे पण मागणी 'आयुक्‍त हटाव'ची!
तुमचे फेक फेसबूक अकाउंट कोणीही उघडू नये म्हणून करा 'या' गोष्टी

शहरातील लोकसंख्येचे कारण पुढे करून महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा आदेश शहरासाठी तसाच लागू केला. त्यानंतर दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी म्हणून व्यापाऱ्यांनी महापौर, महापालिका आयुक्‍त, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली. मात्र, निर्णय न झाल्याने व्यापाऱ्यांच्या हाकेला साद देत माजी आमदार दिलीप माने, महापालिकेतील विरोधी पक्षनेते, काही गटनेत्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. दरम्यान, मुख्यमंत्री शिवसेनेचा असतानाही व्यापाऱ्यांच्या आंदोलनात शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, माजी आमदार दिलीप माने यांनी सहभाग घेतला. मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या दोन गटात राजकारण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर दिलीप माने यांनी आगामी महापालिकेत शिवसेनेचे वर्चस्व असावे, या हेतूने अन्य पदाधिकाऱ्यांना बाजूला सारून शहराच्या प्रश्‍नांवर लक्ष द्यायला सुरू केल्याचीही चर्चा आहे.

आंदोलन निर्बंध शिथिलतेचे पण मागणी 'आयुक्‍त हटाव'ची!
पालकांमुळे 5 वर्षाच्या चिमुकलीसह 13 वर्षांच्या मुलाला कोरोना

मालक अन्‌ बापू कुठे दिसलेच नाहीत?

शहरातील व्यापारी कोरोनाच्या लॉकडाउनमुळे अडचणीत सापडला आहे. दुकानांचे भाडे, महापालिकेचा कर, बॅंकांचे हप्ते आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह असे अनेक प्रश्‍न त्यांच्यासमोर नव्याने उपस्थित झाले आहेत. अशा परिस्थितीत व्यापारी हवालदिल झाला असून हातावरील पोट असलेल्यांना उपाशीपोटी झोपावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करून दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, यासाठी 1 जूनपूर्वी प्रशासनावर दबाव टाकण्याची गरज होती. मात्र, निर्बंध शिथिल होण्याच्या पार्श्‍वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम कुठे दिसल्याच नाहीत. तर मागील काही दिवसांपासून राजकीय घडामोडींपासून दूर असलेले माजी आमदार दिलीप माने यांनी मात्र, प्रशासनासमोर आवर्जुन व्यापाऱ्यांची बाजू मांडली. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून सवलत देण्याची मागणी केली.

आंदोलन निर्बंध शिथिलतेचे पण मागणी 'आयुक्‍त हटाव'ची!
अमेरिकेतील मॉलमधील गोळीबार प्रकरणात 15 वर्षांच्या मुलाला अटक

शिवानंद पाटलांचे वरातीमागून घोडे...

शहरातील सर्व दुकाने उघडण्यासंदर्भात मागील दोन दिवसांपासून दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली अमोल शिंदे, वंचित बहूजन आघाडीचे आनंद चंदनशिवे, कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे हे प्रशासनाला निवेदने दिली. आज आंदोलन केले आणि त्यांना पोलिसांनी गाडीत घालून पोलिस ठाण्याला नेले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील दुकानांसंदर्भात मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याचे वृत्त शहरभर पसरले. त्यानंतर महापालिकेचे सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी निवेदन तयार केले आणि तातडीने आयुक्‍तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तर दुसरीकडे या आंदोलनात कॉंग्रेसचे गटनेते वगळता अन्य कोणताही नेता उपस्थित नव्हता. तर राष्ट्रवादी कॉंग्रेससह भाजप नेत्यांनी मात्र, पाठ फिरविल्याची चर्चा आंदोलन परिसरात रंगली होती. (an agitation was organized at the entrance of solapur municipal corporation for restrictions in the city)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.