महापरिनिर्वाण दिन साधेपणानेच! पासशिवाय नो एंट्री, दोन डोसचेही बंधन

महापरिनिर्वाण दिन साधेपणानेच! पासशिवाय नो एंट्री, दोन डोसचेही बंधन
महापरिनिर्वाण दिन साधेपणानेच! पासशिवाय नो एंट्री, दोन डोसचेही बंधन
महापरिनिर्वाण दिन साधेपणानेच! पासशिवाय नो एंट्री, दोन डोसचेही बंधनesakal
Updated on
Summary

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 6 डिसेंबर रोजी होणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सर्वांनी साधेपणानेच साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) पार्श्‍वभूमीवर 6 डिसेंबर रोजी होणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvana Day) सर्वांनी साधेपणानेच साजरा करावा, असे आवाहन पोलिस आयुक्‍त डॉ. वैशाली कडूकर (Dr. Vaishali Kadukar) यांनी केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य व पर्यावरण आणि वैद्यकीय शिक्षण विभाग आणि संबंधित महापालिका, पोलिस व स्थानिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक राहणार आहे.

महापरिनिर्वाण दिन साधेपणानेच! पासशिवाय नो एंट्री, दोन डोसचेही बंधन
आमदार प्रणिती शिंदेंच्या मतदारसंघात शिवसेनेची डरकाळी

गर्दीतून कोरोना वाढणार नाही, याची दक्षता घेतल्यास निश्‍चितपणे कोरोनाचे संकट दूर होईल, असा विश्‍वास राज्य सरकारला आहे. या पार्श्‍वभूमीवर पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, बुधवार पेठेतील अस्थी विहार आणि सम्राट चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी मानवंदना करण्यासाठी लोकांनी गर्दी करू नये, अशा सूचना पोलिस प्रशासनाने दिल्या आहेत. गर्दी न करता सर्वांनी राहत्या घरातूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेबांना मानवंदना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. मानवंदनेसाठी चार व्यक्‍तींनाच परवानगी राहणार असून त्यासाठी त्यांना संबंधित पोलिस ठाण्यातून पास घ्यावा लागणार आहे.

दुसरीकडे, मानवंदनेसाठी जाणाऱ्या व्यक्‍तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत, असेही पोलिस उपायुक्‍त डॉ. कडूकर यांनी स्पष्ट केले आहे. उद्या (ता. 6) महापरिनिर्वाण दिन असून त्यासंदर्भात पोलिसांनी आज (रविवारी) नियमावली प्रसिद्ध केली आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे पार्क चौक येथून डफरीन चौकाकडे जाणारा वाहतुकीचा मार्ग बंद ठेवला जाणार आहे.

महापरिनिर्वाण दिन साधेपणानेच! पासशिवाय नो एंट्री, दोन डोसचेही बंधन
पोलिस ठाण्यातच स्वीकारली लाच! दोन हजार घेतानाच अडकला जाळ्यात

पोलिस उपायुक्‍तांचे आवाहन...

  • पार्क चौकातील डॉ. बाबासाहेबांचा पुतळा, बुधवार पेठेतील अस्थी विहार, सम्राट चौकातील उद्यान येथे गर्दी करू नये

  • सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास प्रातिनिधिक स्वरूपात मानवंदना करण्यासाठी पोलिसांकडून घ्यावेत पास

  • पास घेण्यासाठी संस्था अथवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात पोलिस ठाण्यांकडे विनंती अर्ज (फोटो व नावासह) करावेत

  • कोरोनामुळे चार व्यक्‍तींनाच असेल डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास मानवंदना करण्याची परवानगी

  • मानवंदनेसाठी जाणाऱ्या व्यक्‍तींनी घेतलेले असावेत कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.