'वंचित'च्या प्रदेश प्रवक्त्यांनी घेतली उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट

'वंचित'च्या प्रदेश प्रवक्त्यांनी घेतली उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट
'वंचित'च्या प्रदेश प्रवक्त्यांनी घेतली उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट
'वंचित'च्या प्रदेश प्रवक्त्यांनी घेतली उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेटCanva
Updated on
Summary

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.

सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे (Anand Chandanshive) हे राष्ट्रवादीच्या (NCP) वाटेवर आहेत. विकासकामांचे निमित्त घेऊन आनंद चंदनशिवे, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक गणेश पुजारी यांनी आज (गुरुवारी) मुंबईमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांची भेट घेतली. या वेळी राष्ट्रवादीचे सुहास कदम उपस्थित होते. या भेटीमुळे आनंद चंदनशिवे आगामी काळात राष्ट्रवादीत जाणार हे निश्‍चित झाले आहे.

'वंचित'च्या प्रदेश प्रवक्त्यांनी घेतली उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट
'कॅबिनेट'साठी प्रणिती शिंदेंकडून भाजप टार्गेट !

बहुजन समाज पार्टीतून वंचित बहुजन आघाडीत गेलेले प्रदेश प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे यांनी आता पक्षाला रामराम ठोकण्याची तयारी केली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे या दोन्ही मामांच्या थेट संपर्कातून त्यांनी वंचित बहुजन आघाडी सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय रंगली आहे. चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांशी वाढलेल्या जवळीकतेतून हे स्पष्ट झाले असून त्यांनीही त्या बाबीला दुजोरा दिला होता. आता चंदनशिवे यांनी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याने चंदनशिवे यांचा राष्ट्रवादी प्रवेश फिक्‍स असल्याचे सिद्ध होत आहे.

बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून 2007 मध्ये चंदनशिवे यांनी प्रथम महापालिकेत प्रवेश केला. लोकसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या प्रभागात वेगळे वलय निर्माण केले. लोकहितासाठी रात्रंदिवस झटणारे, संघटन कौशल्य मजबूत असलेले आणि पक्ष कोणताही असो, स्वत:च्या ताकदीवर महापालिकेत विजयी होणारे चंदनशिवे हे एकमेव आहेत. याची जाणीव राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांना आहे. सत्ता कोणाचीही असो, महापालिकेत आवाज "दादा'चाच हे चित्र महापालिकेत नेहमी पहायला मिळते. सत्ताधारी, विरोधकांशी हातमिळवणी करून प्रभागातील विकासकामे करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. त्यांना त्याचा लाभ झाला 2012 च्या निवडणुकीत झाला. त्यानंतर 2017 च्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या नगरसेवकांची संख्या दोनवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बरोबरीने चार झाली. 2019 ची विधानसभा निवडणुकीत त्यांनी विद्यमान आमदार तथा तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याविरोधात 27 हजार मते मिळविली. त्यांना आमदार व्हायचे आहे, ताकद वाढूनही हे स्वप्न वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पूर्ण होणार नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार असतील, असेही बोलले जात आहे.

'वंचित'च्या प्रदेश प्रवक्त्यांनी घेतली उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट
सेनेचा वाघ गुरगुरतुया, आपल्याच माणसाच्या अंगावर येतुया !

"शहर उत्तर'मधून कोठे की चंदनशिवे

शिवसेनेचे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्धार केला. परंतु, त्यांचा अजून अधिकृत पक्षप्रवेश झालोला नाही. तरीही ते पालकमंत्री असो वा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यात आवर्जुन हजर असतात. शहरात त्यांचीही ताकद मोठी आहे. दुसरीकडे आता चंदनशिवे यांनीही 'वंचित'वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना वैतागून राष्ट्रवादीत जाण्याची मनस्थिती तयार केली आहे. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात त्यांची निर्णायक ताकद आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरमधून राष्ट्रवादीकडून कोठे की चंदनशिवे उमेदवार असतील, याचे गणित आतापासूनच घातले जात आहे.

...तर येईल महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता

महेश कोठे यांच्या समर्थक नगरसेवकांची संख्या सुमारे 14 पर्यंत आहे. तर तौफिक शेख यांचीही ताकद मोठी आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, महेश गादेकर, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, शहराध्यक्ष भारत जाधव, महिला अध्यक्षा सुनिता रोटे, गटनेते किसन जाधव, माजी महापौर मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, दिलीप कोल्हे, प्रवीण डोंगरे, पद्माकर काळे, हारूण सय्यद, विष्णू निकंबे, राजन जाधव यांच्या तगड्या फळीला पालकमंत्री दत्तात्रय भरणे व आमदार संजय शिंदे यांचे पाठबळ मिळेल. त्यांच्या जोडीला आनंद चंदनशिवे यांचीही ताकद आल्यास महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.